पिंपरी, ता. ८ : अहिंसा सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कर्करोग निदान शिबिरामध्ये तीनशेपेक्षा अधिक नागरिकांनी तपासणी केली. शिबिराचे उद्घाटन राजेंद्र मुथा यांच्या हस्ते करण्यात आले. पिंपरी चिंचवड जैन महासंघ, क्रस्ना डायग्नोस्टिक लिमिटेड आणि वर्धमान जैन श्रावक संघ यांच्या विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रा. अशोक पगारिया, सुभाष ललवानी, नितीन बेदमुथा, सुभाष सुराणा, श्रेयांस पगारिया, विलास पगारिया, प्रा. प्रकाश कटारिया, अशोक लुंकड, सतीश मेहेर, आनंद मुथा, डॉ. अशोक बोरा, उमेश पाटील, वीरेश छाजेड, संदीप फुलफगर, राजेंद्र बोरा यांच्यासह डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. चिंचवड स्टेशन जैन स्थानक येथे पार पडलेल्या या शिबिरामध्ये पहिल्याच दिवशी २००, तर दुसऱ्या दिवशी शंभरपेक्षा अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी केली.