हार्टफुलनेस ध्यानयोग शिबिर
esakal April 09, 2025 03:45 AM

कुवारबाव ज्येष्ठ संघाचे
ध्यानयोग शिबिर
रत्नागिरी, ता. ८ : भारत सरकारचे संस्कृती मंत्रालय आणि रामचंद्र मिशन हार्टफुलनेस यांच्या सहकार्याने कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघात हार्टफुलनेस ध्यानयोग शिबिराचे उद्घाटन झाले. जागतिक आरोग्य दिनानिमित्त याचे आयोजन तीन दिवस केले आहे. या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांबरोबरच महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हार्टफुलनेस ध्यानयोग प्रशिक्षक डॉ. सुधीर आकोजवार आणि संगीता आकोजवार यांनी या शिबिरात हार्टफुलनेस ध्यान योगाद्वारे तणावरहित आनंदी जीवन, कौटुंबिक स्वास्थ्य, एकात्मता आणि आध्यात्मिक उन्नती असा हृदयाचा प्रवास कसा अनुभवता येतो याचे प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले. हे शिबिर उद्यापर्यंत (ता. ९) कुवारबाव ज्येष्ठ नागरिक भवनात सायंकाळी ५.३० ते ६:३० या वेळेत चालणार आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष मारूती अंबरे, सदस्य योगप्रशिक्षक गणपत खामकर आणि श्यामसुंदर सावंतदेसाई, सुधाकर देवस्थळी यांचे सहकार्य लाभत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.