मुरबाड नगर पंचायतीची विक्रमी करवसुली
मुख्याधिकाऱ्यांच्या नियोजनामुळे दोन कोटी ४६ लाख जमा
मुरबाड, ता. ८ (वार्ताहर) : मुरबाड नगर पंचायतीद्वारे २०२४-२५ या आर्थिक वर्षात कराद्वारे विक्रमी दोन कोटी ४६ लक्ष एवढी वसुली केल्याची माहिती मुरबाड नगर पंचायत मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी दिली.
मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी करवसुलीसाठी विशेष नियोजन केले होते. यामध्ये सर्वांना करवसुलीबाबत मार्गदर्शन करून पथक निर्माण करण्यात आले होते. वसुलीकामी थकबाकीदारांवर जप्ती नोटीसही बजावण्यात आली होती. तसेच नळजोडणी खंडित करण्याचीही कार्यवाही करण्यात आली. यामध्ये काही वाणिज्य मालमत्ता सीलही केल्या होत्या.
-------------------------------------
२०२४-२५ या वर्षात विविध कराची मागणी व वसुलीमध्ये मालमत्ता कर- एक कोटी ९७ लक्ष (मागणी)-एक कोटी ८६ लक्ष (वसुली)-९४ टक्के, पाणीपट्टी - ८३ लक्ष (मागणी)- ५१ लक्ष (वसुली) - ६१ टक्के, गाळाभाडे- १२ लक्ष (मागणी)- नऊ लक्ष (वसुली) - ७५ टक्के करण्यात आली आहे.
----------------------------------
नियमित कर भरण्याकरिता आवाहन
नगर पंचायतीने करवसुली झाल्यानंतर मुख्याधिकार यांनी मुरबाडमधील नागरिकांचे आभार मानले. तसेच यापुढेही मुरबाड नगर पंचायतीमध्ये सुखसोयी पुरवण्याकरिता नागरिकांनी कराचा नियमित भरणा करण्याकरिता आवाहन करण्यात आले आहे.
---------------------
पथकाचे आभार
यंदाचा उन्हाळा अतिशय कडक जाणवत असला तरी मुरबाड नगर पंचायतच्या करवसुली पथकाने उन्हातान्हाचा कोणताही विचार न करता वसुली केली आहे. त्यामुळे यंदा विक्रमी करवसुली करून दोन कोटी ४६ लाखांची वसुली करण्यात आली आहे.
मनोज म्हसे, मुख्याधिकारी
मुरबाड नगर पंचायत
फोटो क्रमांक एक मध्ये नगर पंचायतचे मुख्याधिकारी मनोज म्हसे