सध्या 'फुले' (Phule ) चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. 'फुले' चित्रपट महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. सध्या हा चित्रपट वादात अडकला आहे. या चित्रपटात महात्मा फुले यांच्या भूमिकेत प्रतीक गांधी आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत पत्रलेखा आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजनंर ब्राह्मण समाजाने आक्षेप घेतला आहे. यामुळे चित्रपटाच्या रिलीजला अडथळे येत आहेत.
आता '' चित्रपटाच्या वाद सुरू असताना बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी पोस्ट शेअर करून आपले मत मांडले आहे. त्यांची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्यांनी सेन्सॉर बोर्डाला खडेबोल सुनावले आहे. कश्यप (Anurag Kashyap) नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात.
अनुराग कश्यपने पोस्ट'धडक 2'च्या स्क्रीनिंगमध्ये सेन्सॉर बोर्डाने सांगितले की, मोदीजींनी भारतातील जातिव्यवस्था संपवली आहे. त्यामुळे 'संतोष' हा चित्रपट देखील भारतात रिलीज झाला नाही. आता ब्राह्मण समाजाला 'फुले' चित्रपटावर आक्षेप आहे. पण जर आता जातिव्यवस्थाच नाही तर कसला ब्राह्मण? कोण आहात तुम्ही? तुम्हाला कसला त्रास होतोय. जर जातिव्यवस्था नव्हती तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले का होते? म्हणजे तुमचा ब्राह्मणवाद अस्तित्वात नाही. कारण मोदींच्या मते भारतात जातिव्यवस्था नाही? तुम्ही सगळे मिळून सगळ्यांना मूर्ख बनवत आहात. भारतात आहे की नाही, हे तुम्ही सगळे मिळून ठरवा. लोक मूर्ख नाहीत.
'फुले' चित्रपटाच्या वादमुळे सिनेमाची रिलीज डेट देखील पुढे ढकलण्यात आली आहे. 'फुले' चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने कात्री मारली आहे. 'फुले' चित्रपट अनंत महादेवन दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाच्या वादामुळे 'फुले' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलून 25 एप्रिल करण्यात आले आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी आतुर असल्याचे दिसत आहे.