बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Kha) सध्या तिच्या 'छोरी 2' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. हा चित्रपट 11 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'छोरी 2' चित्रपटात सोहा अली खानने 'दासी माँ' ची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. अशात आता एका मिडिया मुलाखतीत सोहा अली खान तिच्या आयुष्यात घडलेला भयानक सांगितला आहे.
सांगितले की, "आमचे हरियाणामध्ये घर आहे. ज्याच्या शेजारी एक राजवाडा आहे. त्या राजवाड्याचे नाव 'पीली कोठी' असे आहे. एका रात्री तेथे असे काही घडले की आम्हाला तेथून पतौडी पॅलेसमध्ये राहायला जावे लागले. लोक असे म्हणतात की, 'पीली कोठी' राजवाड्यात राहणाऱ्या लोकांना अचानक कोणीतरी येऊन थप्पड मारायचं. असे मी ऐकले होते. भुतांच्या हाताच्या खुणा त्या लोकांच्या चेहऱ्यावर राहायच्या."
सोहाने पुढे सांगितले की, "एका रात्री माझ्या पणजीलाही एका थप्पड मारली होती. ज्याची खूण तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्यावेळी नेमकं काय घडले मला माहित नाही. पण या घटनेनंतर ते खूप घाबरले आणि तेथून निघून पॅलेसमध्ये राहायला गेलो. आता देखील ही वास्तू रिकामीच आहे. आजही तेथे कोण राहत नाही. "
सोहा अली खानच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'छोरी' हा चित्रपट 2021मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग 'छोरी 2' रिलीज झाला आहे. 'छोरी 2' चित्रपट प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येत आहे. 'छोरी 2'च्या दिग्दर्शनाची धुरा विशाल फुरिया यांनी सांभाळली आहे. या चित्रपटातील सोहा अली खानच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.