अजिंक्य रहाणेच्या 7 हजार धावा
Marathi April 09, 2025 02:25 PM

अजिंक्य रहाणेने 61 धावांची खेळी करताना टी-20 क्रिकेटमध्ये 7 हजार धावांचा टप्पाही गाठला. इडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात रहाणेने लखनौविरुद्ध खेळताना 35 चेंडूंत 8 चौकार आणि 2 षटकार ठोकताना 61 धावा काढल्या. त्याने 276 व्या टी-20 सामन्यात 29.81 च्या सरासरीने 7036 धावा वसूल केल्या. यात 2 शतके आणि 50 अर्धशतकांचाही समावेश आहे. कालच विराट कोहलीनेही टी-20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावांचा पराक्रम साकारला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.