महावितरणच्या एका चुकीनं होत्याचं नव्हतं झालं, जिन्यात करंट उतरला अन् राजनंदिनी एका झटक्यात….
Marathi April 09, 2025 02:25 PM

सोलापूर बातम्या: सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात विजेचा धक्का बसल्याने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजनंदिनी अणय कांबळे असे मरण पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. शहरातल्या कोनापुरे चाळ परिसरात काल (8 एप्रिल) रात्री 9च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, काल  (8 एप्रिल) संध्याकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विजेची तार तुटून लोखंडी जिन्यात विद्युत प्रवाह उतरला. या लोखंडी जिन्याला स्पर्श झाल्याने राजनंदिनी हिला विजेचा तीव्र झटका बसल्याने ती जागीच बेशुद्ध झाली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करताय. त्यामुळे नागरिकांनी संतप्त होत या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे.

दोन सुरक्षा रक्षकांना बांधून आवादा पवन चक्कीच्या साहित्याची चोरी

पवनचक्कीच्या सुरक्षा रक्षकाला बांधून पवन चक्कीचे सुमारे 12 लाख रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे. सध्या केज तालुक्यातआवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीचे पवनचक्की उभारणीचे काम सुर आहे.  अशातच दि.8 एप्रिल रोजी पहाटे सुमारे 2.30 वाजताच्या सुमारास ही चोरीची घटना झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

विडा येथे पवन चक्की उभारणीच्या कामावर काम करीत असलेले सुरक्षा रक्षक झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा रक्षक अभिजित दुनघव व आकाश जाधव यांना त्यांच्या चादर फाडून त्यानेच त्यांचे हातपाय बांधले आणि पवन चक्कीचे केबल व इत्तर साहित्य चोरून नेले आहे.  याबाबतची माहिती सुरक्षारक्षक अभिजित दुनघव व आकाश जाधव यांनी साहित्य चोरीची माहिती आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. याप्रकरणी आकाश जाधव याच्या तक्रारी नुसार १४ अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केज पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

हे ही वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.