आंब्याचे नाव काढताच सर्वांचाच तोंडाला पाणी सुटते. जगभरात क्वचितच असा कोणी एखादा असेल ज्याला आंबा खायला आवडत नाही. आंबा हे फळ अनेकांच्या सर्वात आवडत्या फळांपैकी एक आहे. आंब्याचे लोणचे, आमरस, आंबा बर्फी, आंबा मिल्क शेक असे आंब्यापासून नानाविध पदार्थ तयार केले जातात आणि चवीने खाल्ले जातात. चवीव्यतिरिक्त, आंबा हा आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे कारण त्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. असं सर्व असले तरी आंबा खाण्याची एक योग्य वेळ आहे असे तज्ञ सांगतात. आंबा दिवसभरात कधीही खाऊन चालतं नाही. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात आंबा खाण्याची योग्य वेळ
आंबा हा बीटा-कॅरोटीनचा उत्तम स्रोत आहे, बीटा कॅरोटीनमुळे दृष्टी सुधारण्यास मदत मिळते.
आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए हे पोषक घटक असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
आंब्यामध्ये मॅंगिफेरिन नावाचे ऍटी-ऑक्सिडंट असते, ज्यात कॅन्सरविरोधी गुणधर्म असतात. मॅंगिफेरिन पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवते आणि कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी मदत करते.
आंबा हा पोटॅशियमचा एक स्रोत आहे, जो हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो, ज्यामुळे हृदयरोगाच धोका कमी होतो.
आंबे फायबरसमृद्ध आहेत. फायबरमुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि बद्धकोष्ठता सारख्या पोटाच्या समस्या टाळण्यास मदत मिळते.
आंबा खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी किंवा दुपारच्या जेवणानंतर आहे. कारण रात्री आंबा खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात. रात्रीचे जेवण झाल्यानंतर आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारण सांगण्यात येते. तुम्ही रात्री जेवल्यावर आंबा खाल्लात तर अतिसार, उलट्या होऊ शकतात, यामुळेच रात्रीच्या जेवणानंतर आंबा खाणे टाळावं.
हेही पाहा –