Medha kulkarni left bjp meeting but chandrakant patil and murlidhar mohol support women wing who agitation deenanath mangeshkar hospital
Marathi April 09, 2025 10:24 PM


पुणे : दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावरून भाजपमध्ये दोन वाद उफाळून आला आहे. दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या विरोधात आंदोलन करताना डॉ. सुश्रुत घैसास यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या दवाखान्याची भाजपच्या महिला मोर्चाने तोडफोड केली होती. याचे समर्थन मंगळवारी झालेल्या भाजपच्या बैठकीत करण्यात आले. यावेळी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी भाजपच्या बैठकीतून निघून गेल्या आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आहे का? अशी राजकीय चर्चा रंगली आहे.

‘भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरातील प्रश्नांसाठी नाही, तर संघटनेसाठी आंदोलन केले होते,’ असे सांगत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठराखण केले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही, ‘जशास तसे उत्तर द्या,’ असे सांगितले.

हेही वाचा : कर्जत नगरपंचायतीतील राष्ट्रवादीच्या सत्तेला राम शिंदेंनी खिंडार पाडले, रोहित पवार म्हणाले, सभापतींनी महोदयांनी…

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत भाजपची मंगळवारी रात्री बैठक पार पडली. या बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांनी केलेल्या केलेल्या आंदोलनाचे पडसाद पडण्याची शक्यता होती. झाले तसेच….

भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात आंदोलन करताना घैसास यांच्या खासगी दवाखान्याची तोडफोड केली होती. त्यांच्या या तोडफोडीवर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत शहराध्यक्ष धीरज घाटे यांना संबंधित कार्यकर्त्यांना समज द्यावी, असे पत्रच पाठविले होते. त्यामुळे महिला आघाडीमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. त्यावरून पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. मात्र, शहर भाजपच्या बैठकीत महिला आघाडीच्या आंदोलनाचे समर्थन करण्यात आले.

या बैठकीत मंत्री पाटील म्हणाले, “महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन त्यांच्या घरासाठी नव्हते, तर संघटनेसाठी केले होते. आंदोलन करताना ते चुकीच्या पद्धतीने झाले असले, तरी त्यांचे मनोबल खच्ची केले नाही.”
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनीही आंदोलनाचे समर्थन करताना म्हटलं, “19 वर्षांपूर्वी आंदोलन करताना माझ्याकडून तोडफोड झाली होती, ती चुकीचीच होती. मात्र, कार्यकर्ता म्हणून पक्ष माझ्याबरोबर राहिला. तुम्ही जशास तसे उत्तर द्यायला शिका, असे सांगत एखादा आपल्या पक्षाचा नेता चुकीचे सांगत असेल, तर तुम्ही चुकीचे बोलताय हे स्पष्टपणे सांगा.”

पक्षाची बैठक सुरू होण्याआधीपासून खासदार मेधा कुलकर्णी बैठकीला उपस्थित होत्या. परंतु, मंत्री पाटील आणि त्यापाठोपाठ मंत्री मोहोळ बैठकीला आल्यावर त्यांची भाषणे होण्यापूर्वीच खासदार कुलकर्णी बैठक अर्धवट सोडून निघून गेल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : ‘कळला का माझा हिसका, आता…’, म्हणत विठुरायाचे दर्शन घेऊन येणाऱ्या पती-पत्नीवर अचानक फायरिंग, घटनेने खळबळ



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.