गुजरात टायटन्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 23 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं आहे. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 217 धावा केल्या. गुजरातसाठी ओपनर साई सुदर्शन याने सर्वाधिक 82 धावा केल्या. तर जोस बटलर आणि शाहरुख खान या दोघांनी निर्णायक खेळी करत गुजरातला 200 पार पोहचवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. तर राहुल तेवतिया आणि राशिद खान या जोडीने अखेरच्या क्षणी फटकेबाजी करत छोटेखानी मात्र महत्त्वपूर्ण धावा जोडल्या. आता राजस्थानचे फलंदाज या धावांचा पाठलाग करण्यात यशस्वी ठरतात का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि इशांत शर्मा.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), नितीश राणा, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षाना, फजलहक फारुकी, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे.