प्रेम कधी आणि कुणावर होईल हे सांगता येत नाही. प्रेमाला सीमांची, वयाची बंधनं नसतात. जगाला थक्क करून टाकणाऱ्या अनेक प्रेमकहाण्या तुम्ही आतापर्यंत ऐकल्या आणि वाचल्या असतील. अशीच एक आगळीवेगळी लव्ह स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. अमेरिकेची एक सुंदर महिला भारतातल्या एका खेडेगावात राहणाऱ्या तरुणावर भाळली आहे. या दोघांच्याही लव्हस्टोरीची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे.
अमेरिकेची जॅकलीन पोहोचली भारतातल्या खेड्यात
भारतातल्या एका खेडेगावात राहणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडणाऱ्या या तरुणीचं नाव जॅकलीन फोरेरो असे आहे. तर भारतातल्या या तरुणाचं नाव चंदन असं आहे. तो मूळचा आंध्र प्रदेशातील एका खेड्या गावातला आहे. या दोघांची मनं जुळल्यावर ही तरुणी चंदनसाठी भारतातही येऊन गेली आहे. सध्या हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत.
या दोघांची ओळख इन्स्टाग्राच्या माध्यमातून झाली. त्यांच्या लव्हस्टोरीला फक्त ‘हाय’ या मेसेजने सुरुवात झाली. अगोदर हे दोगेही इन्स्टाग्रामवर चॅटिंग करायचे. हळुहळू त्यांच्या मैत्री झाली. याच मैत्रीचे नंतर प्रेमात रुपांतर झाले. साधारण 14 महिने ते एकमेकांशी बोलत होते. हळुहळू ते प्रेमातही पडले. लवकरच हे कपल लग्नबंधनात अडकण्याचा विचार करतंय.
विशेष म्हणजे फोरेरोने आपल्या या नात्याबाबात इन्स्टाग्रामवर सविस्तर लिहिलेलं आहे. तिने चंदनसोबतचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मी सर्वांत अगोदर चंदनला मेसेज केला होता. त्याच्या प्रोफाईलवरून तो एक भावनिक असल्याचं वाटलं. तसेच तो धर्मशास्त्राचा अभ्यासकही आहे, हे मला त्यांचं इन्स्टाग्राम खातं पाहून समजलं, अशी माहिती फोरेरोने दिली आहे.
जॅकलीन ही चंदनपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. इन्स्टाग्रामवरील चॅटिंग आणि व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून हे दोघे एकमेकांच्या प्रेमात बडुले. आता चंदनसोबत लग्न करण्यासाठी जॅकलिन भारतात आली आहे. दरम्यान, या दोघांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जात आहेत.