जपानमधील चेरी ब्लॉसम पाहण्यासाठी जगभरातून लोकं इथे येतात. यावेळी जपानमधील वातावरण गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या फुलांनी सजलेलं असतं. जपानमधील चेरी ब्लॉसम पाहण्यासाठी लाखो लोक उद्यानांमध्ये आणि नदीकाठावर जमतात. जपानमध्ये दरवर्षी साकुरा किंवा चेरी ब्लॉसमचा हंगाम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वसंत ऋतूची सुरुवात होते आणि स्थानिक तसेच पर्यटक दूरदूरून या दृश्याचा आनंद घेण्यासाठी येतात. पण आता ही झाडे जुनी होत असून त्यांना देखभालीची गरज आहे. जर या झाडांची योग्य प्रकारे देखभाल केली नाही तर येणाऱ्या काळात ही झाडे नष्ट होण्याची देखील शक्यता आहे.
Samsung चे जुने स्मार्टफोन आता होणार सुपरफास्ट, या डिव्हाईसना मिळणार Galaxy One UI 7 Update चा सपोर्ट! वाचा पूर्ण लिस्ट
जपानमधील ही झाडे वाचवण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. एका जपानी कंपनीने एक AI टूल तयार केले आहे जे फक्त फोटो पाहूनच झाड किती निरोगी आहे हे सांगू शकते. भविष्यात या झाडांना वाचवण्यासाठी हे तंत्रज्ञान खूप मदत करू शकते. जपानमधील प्रसिद्ध चेरीची झाडे आता जुनी होत चालली आहेत, ही झाडे सुमारे 70 ते 80 वर्षांची आहेत. या वयात त्यांची काळजी घेणे आणि त्यांना निरोगी ठेवणे कठीण होत चालले आहे. या समस्यांना तोंड देण्यासाठी, प्रसिद्ध जपानी कंपनी किरिनने “साकुरा AI कॅमेरा” हे नवीन AI टूल विकसित केले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
साकुरा AI कॅमेरा हे टूल स्मार्टफोनने घेतलेल्या चेरी ब्लॉसमच्या फोटोंवरून झाडाची स्थिती आणि वय याबद्दल माहिती देते. युजर्सना फक्त त्यांचे फोटो वेबसाइटवर अपलोड करावे लागतील आणि नंतर साकुरा AI टूल झाडाला “खूप निरोगी” ते “चिंतेचा विषय” पर्यंत 5-पॉइंट स्केलवर रेट करेल. तज्ञांच्या मदतीने गोळा केलेल्या 5,000 प्रतिमांसह या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आतापर्यंत, सुमारे 20,000 नवीन छायाचित्रे प्राप्त झाली आहेत आणि ही सर्व माहिती स्थानिक प्रशासनाला मोफत दिली जात आहे जेणेकरून ते झाडांची चांगली काळजी घेऊ शकतील.
विकसित करण्यात आलेल्या या नवीन तंत्रज्ञानामुळे जुन्या होत असलेल्या चेरीच्या झाडांची काळजी घेण्यासाठी मदत होणार आहे. झाडं किती जुनं आहे, त्याला देखभालीची गरज आहे, अशी माहिती तंत्रज्ञान देणार आहे आणि या माहितीनुसार सरकार या झाडांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवू शकतात.
14999 रुपयांच्या किंमचीच लाँच झालं Huawei चं नवं स्मार्टवॉच! वर्कआउट मोडसह मिळणार हे खास फीचर्स, इथून करा खरेदी
टोकियोच्या मेगुरो वॉर्डनुसार, एक नवीन चेरीचे झाड लावण्यासाठी सुमारे 10 लाख येन म्हणजेच सुमारे 5.5 लाख खर्च येतो. म्हणूनच, जुनी झाडे वाचवणे आणि त्यांची वेळेवर काळजी घेणे खूप महत्वाचे झाले आहे. जपान ट्री डॉक्टर्स असोसिएशनचे हिरोयुकी वाडा हे या एआय प्रकल्पाचे पर्यवेक्षक आहेत. ते टोकियोच्या अनेक भागातील झाडांचे परीक्षण करतात. ते म्हणतात की हे उपकरण शास्त्रज्ञांना झाडे का खराब होत आहेत हे समजून घेण्यास मदत करेल. ते म्हणाले की, हवामान बदल, अति उष्णता आणि पावसाचा अभाव यामुळेही झाडांची स्थिती बिघडत आहे.