डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेची चर्चा ही देशातच नव्हे तर परदेशात आजही होत असते.
बाबासाहेब हे ग्रंथप्रेमी व्यक्ती होते, त्यांनी स्वतः अनेक पुस्तकं लिहिली, त्यांच्या पश्चात त्यांच्या गाजलेल्या भाषणांची आणि लेखांचीही अनेक पुस्तक प्रकाशित झाली.
त्यांचं पुस्तकांवरील प्रेमाचं सर्वात मोठा दाखला म्हणजे, लोक स्वतःसाठी घर बांधतात पण बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घर बाधलं होतं.
त्यांच्या या पुस्तकघरात आजही लाखांवरच पुस्तकं आहेत. पण त्यांनी जेव्हा हे घर बांधलं तेव्हा त्यात विविष विषयांवरची शेकडो पुस्तक होती.
यामध्ये तत्वज्ञानाची ६ हजार, अर्थशास्त्राची १ हजार, युद्धशास्त्राची ३ हजार, धर्मशास्त्राची २ हजार, राजकारणावर ३ हजार, कायद्याची ५ हजार पुस्तक होती.
सन १९३३ साली बाबासाहेबांनी एवढ्या मोठ्या ग्रथंसंपदेसाठी दादरच्या हिंदू कॉलनीत सुरेख असं दुमजली घर बाधलं.
या पुस्तकांच्या घराचं नावही त्यांनी एका विद्वानाच्या घराच्या नावावरुन ठेवलं. हा विद्वान अन् तत्वज्ञ म्हणजे गौतम बुद्ध आणि त्यांच्या राजेशाही घराचं नाव 'राजगृह'.
आपल्या या पुस्तकांच्या घरात बाबासाहेब तासन् तास ग्रंथ वाचत बसायचे, त्यामुळंच बाबासाहेबांना प्रज्ञासूर्य असही संबोधलं जातं. पुस्तकांसाठी खास घर बांधणारी ही जगातील एकमेव व्यक्ती आहे.