Beed Crime : आधी माय-लेकाचं अपहरण, नंतर बेदम मारहाण; बीडमधील खळबळजनक घटना
Saam TV April 12, 2025 10:45 PM
योगेश काशिद, साम टीव्ही

बीड : बीडमध्ये गुन्हेगारी सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. बीडच्या शिरूरमध्ये जुन्या वादातून तरुणाचे आईसह अपहरण करत अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. बीडच्या शिरुर पोलीस ठाण्यातील हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणाला बेदम मारहाण केल्यानंतरही आरोपी फरार असल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या शिरूरमधील घाटशीळ पारगावमध्ये जुन्या वादातून तरुण आणि त्याच्या आईला अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. दोघांचेही अपहरण करण्यात आले. त्यानंतर मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या मारहाणीमुळे तरुणाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कृष्णा दादासाहेब घोडके असे या नाव आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आबे. मात्र अद्यापही या प्रकरणातील आरोपी फरारच आहेत. त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी पीडित कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी कृष्णा घोडके या तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती. मारहाण करण्याऱ्या आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मंगेश तांबारे तरुणाला अटक करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांपैकी उर्वरित तरुण फरार आहेत.

गुन्हा घडून ४२ दिवस झाले तरी प्रमुख आरोपींना अटक न केल्याने पीडित तरुणाने अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. आरोपींना अटक केली नाही, तर कुटुंबासहित उपोषणाला बसण्याचा इशारा पीडित तरुणाने दिला आहे. उपोषणानंतर होणाऱ्या परिणामाला कार्यालय जबाबदार राहील, याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी, अशी विनंती पीडित आरोपीने केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.