आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 27 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने आहेत. पंजाब किंग्सने हैदराबादला विजयासाठी 246 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावादरम्यान पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाराजी व्यक्त करत संताप जाहीर केला. बॉलरने केलेल्या मागणीवरुन अंपायरने कर्णधाराचा अंतिम निर्णय न घेता रिव्हीव्यूचा इशारा केल्याने श्रेयसने राग व्यक्त केला, असं म्हटलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजाने कर्णधाराला मर्जीत न घेता रिव्हीव्यूची मागणी केल्याने श्रेयस संतापला, असंही म्हटलं जात आहे. त्यामुळे श्रेयसचा पारा चढला. श्रेयसने भर मैदानात संताप व्यक्त केला. तसेच हातवारे करत मला विचार ना, असंही श्रेयसने म्हटलं. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे नक्की प्रकरण काय आहे? हे सविस्तर जाणून घेऊयात.
हैदराबादच्या डावातील पाचवी ओव्हर ग्लेन मॅक्सेवल टाकत होता. मॅक्सवेलने टाकलेल्या पहिल्या बॉलवर अभिषेक शर्मा याने एक धाव घेतली. त्यामुळे ट्रेव्हीस हेड स्ट्राईकवर आला. मॅक्सवेलने टाकलेला दुसरा बॉल हा लेग साईडला गेला. बॉल हेडच्या बॅटला कट लागून गेल्याचं मॅक्सवेलला वाटलं. त्यामुळे बॉलर आणि विकेटकीपर दोघांनी जोरदार अपील केली. तर दुसऱ्या बाजूला अंपायरने वाईड असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे मॅक्सवेलने क्षणाचा विलंब न लावता रिव्हीव्यू घेतला. त्यानंतर श्रेयसचा पारा चढला. श्रेयसने हातवारे केले आणि मला तर विचार ना, असं म्हटलं. मात्र श्रेयस असं नक्की पंचांना म्हटलं की ग्लेन मॅक्सवेल याला हे नक्की समजू शकलेलं नाही.
नियमानुसार कर्णधार जोवर सांगत नाही तोपर्यंत रिव्हीव्यू घेता येत नाही. तसेच 15 सेकंदांमध्ये रिव्हीव्यू घ्यायचा की नाही, हे ठरवायचं असतं. श्रेयसने 2 सेकंद बाकी असताना रिव्हीव्यू घेतला. हेडच्या बॅटला नाही तर, पॅडला बॉल लागल्याचं रीव्हीव्यूमधून स्पष्ट झालं. त्यामुळे पंचाला वाईडचा निर्णय मागे घ्यावा लागला. मात्र श्रेयसने संतापल्याने आता सोशल मीडियावर या सर्व प्रकाराची चर्चा रंगली आहे.
इगो दुखावला, श्रेयस भडकला
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जीशान अन्सारी, मोहम्मद शमी आणि एशान मलिंगा.
पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि युझवेंद्र चहल.