UPI Down : आज शनिवार 12 एप्रिल रोजी, देशभरात अचानक UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) सिस्टम सेवा ठप्प झाली आहे. ज्यामुळे अनेक युजर्सना डिजिटल पेमेंट करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारख्या प्रमुख अॅप्सवर तक्रारी येऊ लागल्या आहेत.
किराणा दुकाने, मॉल आणि रेस्टॉरंट्समध्ये लोक बिल भरू शकत नाहीत, त्यामुळे अनेक ठिकाणी गैरसोय झाली आहे. युजर्सनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे आणि तक्रारी पोस्ट केल्या आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत 1,200 हून अधिक लोकांनी डाउनडिटेक्टर वेबसाइटवर UPI सेवेत व्यत्यय आल्याची तक्रार केली.
यापैकी, 66% युजर्सनी न झाल्याची तक्रार केली, तर 34% युजर्सनी ट्रान्सफरमध्ये व्यत्यय येत असल्याची तक्रार केली. ही समस्या कोणत्याही एका बँकेपुरती किंवा अॅपपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण UPI नेटवर्कवर याचा परिणाम झाला आहे. सध्या, एनपीसीआयकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
UPI ही अशी प्रणाली आहे ज्याद्वारे तुम्ही पैसे पाठवू शकता. जेव्हा ते काम करत नाही तेव्हा व्यवहार ठप्प होतात. UPI सेवा एनपीसीआयने विकसित केली आहे. त्यांच्या ऑपरेशन आणि देखभालीची जबाबदारीही त्यांच्यावर आहे.
UPI सेवा ठप्पा झाल्यामुळे देशभरातील पेमेंटवर परिणाम झाला आहे. ही समस्या सर्व्हर ओव्हरलोड, देखभालीच्या कामामुळे की सायबर सुरक्षेच्या चिंतेमुळे निर्माण झाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.