आयपीएल 2025 स्पर्धेत दोन खेळाडू रिटायर्ड आऊट झाले आहे. मुंबई इंडियन्सचा तिलक वर्मा आणि चेन्नई सुपर किंग्सचा डेवॉन कॉनवे या पर्वात रिटायर्ड आऊट झाले आहेत. आयपीएल इतिहासात अशा पद्धतीने एकूण 5 खेळाडू बाद झाले आहेत. पण मोक्याच्या क्षणी तिलक वर्मा आणि डेवॉन कॉनवे रिटायर्ड आऊट झाल्याने क्रीडाप्रेमींना धक्का बसला आहे. या मागे नेमकं कारण काय? असे एक ना अनेक प्रश्न क्रीडाप्रेमींना पडले आहेत. लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात तिलक वर्मा फटकेबाजी करताना संघर्ष करत होता. त्यामुळे संघावर दबाव वाढला होता. त्यामुळे त्याच्या जागी सँटनरला फलंदाजीसाठी बोलवलं. मात्र या निर्णयामुळे बरीच चर्चा रंगली. कारण मुंबई इंडियन्सने हा सामना गमवला होता. हार्दिक पांड्याने कोलकाता विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर नेमका हा निर्णय का घेतला? त्याबाबत सांगितलं. ‘तिलक वर्माला दुखापत झाली होती. त्याच्या बोटाला दुखापत झाल्याने त्याच्या जागी दुसरा खेळाडू पाठवावा असं विचार प्रशिक्षकाने केला होता.’ असं हार्दिक पांड्याने सांगितलं. ...