पंचांग -
रविवार : चैत्र कृष्ण १, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.२०, सूर्यास्त ६.४९, चंद्रोदय सायंकाळी ७.१३, चंद्रास्त सकाळी ६.५४, पौर्णिमा समाप्ती प. ५.५२, भारतीय सौर चैत्र २३ शके १९४७.
दिनविशेष -
१९९९ - भारताची ‘निशांत’ या चालकरहित लढाऊ विमानाची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.
२००१ - देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिवपदाची सूत्रे चोकिला अय्यर यांनी हाती घेतली. त्या भारतीय परराष्ट्र सेवा अधिकाऱ्यांच्या १९६४च्या बॅचमधील अधिकारी आहेत.
२००५ - भारताचा ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद याने ‘चेस ऑस्कर’ पुरस्कार पटकावला.