आयपीएलच्या 18 व्या मोसमात आज 13 एप्रिलला डबल हेडरचा थरार रंगणार आहे. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्याच लढत होणार आहे. एका बाजूला राजधानी दिल्लीने या मोसमातील सर्व सामने जिंकले आहेत. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला 5 पैकी 4 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पलटणच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं जवळपास निश्चित समजलं जात आहे.
दिल्ली कॅपिट्ल्सची नव्या कर्णधारासह या मोसमात आतापर्यंत अप्रतिम कामगिरी राहिली आहे. आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच पूर्णवेळ कर्णधार म्हणून भूमिका बजावत असताना केएल राहुल याने आपली छाप सोडली आहे. अक्षरने 4 पैकी सामन्यात दिल्लीला विजयी केलं आहे. तर दिल्लीला 5 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. अशात मुंबईचा विजय मिळवून पॉइंट्स टेबलमधील स्थान सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी कर्णधार हार्दिक पंड्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल करु शकतो.
हार्दिक पंड्या दिल्ली विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमधून रियान रिकेल्टन याला डच्चू देऊ शकतो. रायनला गेल्या पाचही सामन्यात संधी मिळाली आहे. मात्र रायनला फक्त एकदाच अर्धशतकी खेळी करता आली आहे. तर इतर सामन्यात त्याला काही खास करता आलेलं नाही. त्यामुळे कर्णधार हार्दिक रायन रिकेल्टनला डच्चू देऊ शकतो.
रायनच्या जागी संघात रॉबिन मिंझ याला संधी मिळू शकते. रॉबिनला संधी मिळाल्यास तो विकेटकीपिंग करु शकतो. तसेच असं झाल्या रोहित शर्मा तिलक वर्मासह ओपनिंग करु शकतो. तर रॉबिन मधल्या फळीत बॅटिंगसाठी येऊ शकतो.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : तिलक वर्मा, विल जॅक, रॉबिन मिंज (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधाक), नमन धीर, मिचेल सेंटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि विग्नेश पुथुर.
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.
दिल्ली कॅपिटल्स संघ : अक्षर पटेल (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, टी नटराजन, करुण नायर, मोहित शर्मा, दुष्मंथा चमीरा, अजय जाधव मंडल, दर्शन नळकांडे, समीर रिझवी, डोनोवन फरेरा, त्रिपुराण विजय, मानवंथ कुमार एल, विपराज निगम आणि माधव तिवारी.