जलगाव: मी निवडून येणार नाही असं म्हणायचे, मात्र लाडक्या बहिणींनी करेक्ट कार्यक्रम केला आणि आपल्या आशीर्वादाने मी निवडून आलो. मंत्रिपद मिळेल की नाही याची गॅरंटी नव्हती. पण तेच खातं पुन्हा मिळालं. महाराष्ट्रात पालकमंत्री पदावरून अनेक किरकोळ वाद झाले पण जळगाव जिल्ह्यात वाद झाला नाही. सलग दुसऱ्यांदा मी जळगावचा पालकमंत्री झालो असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. बोलताना नाशिक आणि पालघरच्या पालकमंत्री पदावरून होणाऱ्या वादावरही ते बोलले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. (Gulabrao Patil)
मी निवडून येणार नाही असं सगळे म्हणायचे मात्र लाडक्या बहिणींनी चांगलाच कार्यक्रम केला आणि आपल्या आशीर्वादाने मी निवडून आलो. पुन्हा मंत्री होणार नाही होणार नाही असं म्हटलं जात होतं. पूर्वी सव्वाचार आमदारांच्या मागे एक मंत्री होता आता सव्वा सात आमदारांच्या मागे एक मंत्री आहे. एवढी स्पर्धा होती. संख्या वाढली त्यात मी जुना होतो त्यामुळे मतदान करतात की नाही असं वाटत होतं. पण मंत्री झालो. पुन्हा तेच खात मिळालं. पालकमंत्री होईल की नाही ते सुद्धा वाटत नव्हतं. करण महाराष्ट्र मध्ये पालकमंत्री पदावरून अनेक आपसात किरकोळ वाद झाले. पण जळगाव जिल्ह्यात वाद झाला नाही. मला विचारलं गिरीश भाऊ पालकमंत्री झाले तर काय वाटतं मी म्हणलं चांगलं वाटतं. सावकारी पण झाले तरी मला चालतं. त्यांना विचारलं तर ते म्हणायचे गुलाबराव पाटील झालं तरी चालतं. माणसाने संयमाने सगळ्यांना घेऊन चालले वाद-विवाद कमी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं काम होतं. तुमच्या आशीर्वादाने एवढ्या मोठ्या जळगाव जिल्ह्याचा मी दुसऱ्या वेळेस पालकमंत्री होऊ शकलो. असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. जळगाव तालुक्यातील नाशिराबाद येथे विकास कामांच्या भूमिपूजनांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कार्यक्रम पाडत पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यामुळे पालघरचा पालकमंत्रीपदाचा प्रश्न सुटणार अशा चर्चा वाढल्या होत्या. मात्र, या विषयावरून काही चर्चा झाली नसल्याचीही चर्चा झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थमंत्री अजित पवारांची गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार केल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. यावरूनही शिंदे गटासह राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
अधिक पाहा..