खोपोली, ता. १३ (बातमीदार) ः महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज व सम्राट अशोक यांची संयुक्त जयंती महोत्सव खोपोली नगरपालिकेच्या माध्यमातून साजरा केली जात आहे. त्या निमित्त पाच दिवस विविध मान्यवरांचे व्याख्यान व प्रबोधनात्मक संवाद कार्यक्रम होत आहेत. शुक्रवारी (ता.१३) किरण माने यांनी, शिवराय ते भीमराय यावर व्याख्यान दिले. शनिवारी (ता.१४) राहुल गिरी यांनी महापुरुषांच्या विचारांचे झाले काय व तुमच्या आमच्या हाती आले काय, यावर व्याख्यान झाले. दोन्ही मान्यवरांनी इतिहासातील थोर पुरुषांच्या विचारांचे आदर्श ठेवूनच समाज व्यवस्था मजबूत करण्याचे आवाहन केले. तसेच वर्तमान राजकीय व्यवस्था, धार्मिक, समाजात विध्वंस निर्माण करणारे राजकारणी व त्यांचे पाईक बनत चालली जनता यांना आता तरी भानावर या व शिवाजी महाराज, शाहू फुले आणि आंबेडकरी विचाराने वाटचाल करण्याचे आवाहन केले.
खोपोली : डॉ.आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त व्याख्यान आयोजित केले होते.