Goa News: किओस्कजवळ आढळला अज्ञात पुरूषाचा मृतदेह
dainikgomantak April 14, 2025 05:45 AM
Goa News: किओस्कजवळ आढळला अज्ञात पुरूषाचा मृतदेह

पणजीत जीएमसी येथील किओस्कजवळ अज्ञात पुरूषाचा मृतदेह (५० वर्ष) आढळला. पोलिसांकडून तपास सुरू.

Vishwajeet Rane: जुन्या गोव्यात २०० मीटरचा बफर झोन- मंत्री विश्वजित राणे

जुन्या गोव्यात २०० मीटरचा बफर झोन असल्याने चर्चच्या परिसरात बांधकामाला परवानगी मिळणार नाही.

Goa Temple News: ताळगाव येथील श्री शंकर देवस्थान कमिटीच्या अध्यक्षपदी रमाकांत नाईक यांची बिनविरोध निवड

ताळगाव येथील श्री शंकर देवस्थान कमिटीच्या अध्यक्षपदी रमाकांत नाईक यांची बिनविरोध निवड. तसेच, उपाध्यक्षपदी दयानंद खांडेपारकर, सचिव ऊदय शिरोडकर, उप सचिव समिर शेट, खजिनदार वल्लभ नाईक आणि उप खजिनदार म्हणून दिलीप केरकर यांची निवड करण्यात आली.

Goa Crime: रायमध्ये कामगाराची हत्या

ओडिशाचा रहिवासी असलेला खगेश्वर साबर, वय ४०, याची गोल्डन हाऊस चाल सोनारवाडो राय येथे भाड्याने घेतलेल्या खोलीत हत्या करण्यात आली. मृतासोबत दोन रूममेट राहत होते, दोन्ही संशयित फरार झाले आहेत; मायना-कुडतरी पोलिस आणि फॉरेन्सिक टीम तपास करत आहेत.

Goa Crime: बार्देशमध्ये सोने चोराला अटक

बार्देशमधून पोलिसांनी ३.६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करत एकाला अटक केली आहे.

Palm Sunday: गोव्यात पाम संडेचा उत्साह

गोव्यातील विविध भागांमध्ये आज ख्रिस्ती धर्मियांकडून पाम संडे उत्साहात साजरा.

Goa Accident: मोले-नंद्रण अपघातात दोघांचा मृत्यू

मोले नंद्रण येथे राष्ट्रीय महामार्गवर बंद पडलेल्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक. दुचाकी चालक राजेश देसाई (२५ जोईडा, कर्नाटक) व दुचाकीस्वार निखिल मडिवल (२४ हलियाल कर्नाटक) यांचा मृत्यू. पोलिस तपास चालु आहे.

IPL Cricket Betting: सांगोल्डा येथे आयपीएल बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश

सांगोल्डा येथे सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) सामन्यांवर सट्टा लावण्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून एक मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.

Sanquelim: साखळीत वीरभद्राचा थरार

विठ्ठलापूर साखळीतील चैत्रोत्सवाचे खास आकर्षण असलेल्या वीरभद्राचा थरार हजारोंच्या संख्येने उपस्थित लोकांनी अनुभवला. हातातील तलवारी नाचवताना अवसरावर आक्रमक झाला वीरभद्र. रथोत्सवानंतर या उत्सवाची सांगता झाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.