Papaya Benefits : चमकदार त्वचेसाठी पपई सर्वोत्तम
Marathi April 14, 2025 09:25 AM

आतड्यांचे आरोग्य असो किंवा त्वचेची काळजी घेणे असो, पपई दोन्हींसाठी सर्वोत्तम आहे. त्यामध्ये आढळणारी जीवनसत्त्वे आणि एंजाइम्स त्वचेचे आरोग्य वाढवतात आणि ती निरोगी व चमकदार ठेवण्यास मदत करतात. जर तुमच्या त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादनांमध्ये पपईचे गुणधर्म असतील तर तुम्हीदेखील चमकदार व तेजस्वी त्वचा मिळवू शकता. आजच्या या लेखातून जाणून घेऊयात त्वचेकरता उपयुक्त असणारे पपईचे काही गुणधर्म.

पपईमध्ये लायकोपीन अँटीऑक्सिडंट आढळते, जे वृद्धत्व कमी करण्यास मदत करते. ते फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानाशी लढून सुरकुत्या रोखते.

पपईमध्ये आढळणारे पपेन आणि किमोपापेन हे एंजाइम मृत त्वचा काढून टाकतात आणि त्वचेत असणारी बंद छिद्रे उघडतात, ज्यामुळे मुरुमांची समस्या कमी होते. यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते जे त्वचेचा मुरुमांपासून बचाव करण्यासाठी प्रभावी असल्याचे समजले जाते.

पपईमध्ये एंजाइम, बीटा-कॅरोटीन, फायटोकेमिकल्स आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असल्याने, त्यात त्वचेला उजळवण्याचे गुणधर्म देखील असतात. पपई त्वचा उजळ करते आणि त्वचेवरील काळे डागही कमी करते.

पपईचा समावेश असलेल्या किंवा पपईच्या गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या फेस वॉशचा नियमित वापर केल्याने चेहऱ्यावर साचलेली धूळ, घाण दूर होते आणि चेहरा चमकदार राहण्यास मदत होते.

पपईचे गुणधर्म असलेले हेअर रिमूव्हल क्रीम वापरल्याने त्वचेची जळजळ होण्याची समस्या कमी होते आणि त्वचा कोरडी व निस्तेज होत नाही. त्यात वनस्पती-आधारित अँटीऑक्सिडंट असते जे त्वचेच्या स्वच्छतेसाठी चांगले असते.

पपईमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि एंझाइम्स असल्याने, त्वचेला बराच काळ ओलावा ठेवण्याची क्षमता असते. कोरडी त्वचा असलेल्या लोकांसाठी पपईच्या गुणधर्मांनी समृद्ध मॉइश्चरायझर वापरणे त्वचेकरता उत्तम ठरू शकते.

या फळाच्या गरासोबतच त्याच्या बिया देखील खूप फायदेशीर आहेत. अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये पपईप्रमाणेच त्याच्या बियांचाही वापर केला जातो.

तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी पपईचे गुणधर्म असलेली उत्पादने समाविष्ट करा आणि निर्दोष आणि चमकदार त्वचा मिळवा .

होममेड पपई फेस स्क्रब

आवश्यक साहित्य

स्तुती – 1 कप
मध – 1 टीस्पून
साखर – 1/2 टीस्पून
लिंबाचा रस – 4 ते 5 थेंब

बनवण्याची पद्धत

फेस स्क्रब बनवण्यासाठी, प्रथम पपईचा गर काढून घ्यावा.
यासाठी पिकलेल्या पपईचे काही तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवा.
ही पेस्ट एका भांड्यात घ्या आणि त्यात मध, लिंबाचा रस आणि साखर मिसळा .
पेस्ट चांगली मिसळून त्याचे स्क्रब तयार करा.
आठवड्यातून एकदा हे स्क्रब तुम्ही वापरू शकता.

हेही वाचा : Fashion Tips : नेकलाईन नुसार स्टाईल करा दुपट्टा


संपादित – तनवी गुडे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.