मालिकांमधून आपली स्वतःची विशेष ओळख बनवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसतात. वेगवेगळ्या रील ते कायम पोस्ट करत राहतात. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी आजवर अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटात काम केले आहे. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्या कोकणात गेल्याचे दिसत आहे. कोकणाच्या (Konkan) मातीत त्यांनी चविष्ट पदार्थ बनवला आहे.
मे महिन्याची चाहूल लागताच सर्वजण धाव घेतात. उन्हाळ्यात कोकणात बनवले जाणारे पदार्थ खूप चवदार आणि प्रसिद्ध असतात. मे महिना हा आंबे, फणस आणि काजूंचा असतो. यात नारकरांनी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओतून चाहत्यांना 'काजूच्या बोंडूचं भरीत' कसे बनवावे, याची रेसिपी सांगितली आहे.
'काजूच्या बोंडूचं भरीत' रेसिपी'बोंडूचं भरीत' (Cashew Recipe) बनवण्यासाठी सर्वप्रथम काजूच्या बोंडांचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवून घ्या. एका बाऊलमध्ये काजूच्या बोंडांचे तुकडे मॅश करून घ्या. यात मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून मिक्स करा. त्यानंतर थोडे दही सुद्धा घाला. चवीनुसार मीठ आणि साखर घालून मिश्रण एकजीव करा. आता पॅनमध्ये तूप आणि हिंग टाकून फोडणी तयार करा. जी काजूच्या बोंडाच्या मिश्रणावर टाका. अशाप्रकारे 'काजूच्या बोंडूचं भरीत' तयार झाले आहे.
ऐश्वर्या नारकरांनी यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पाककौशल्याचे कौतुक होताना पाहायला मिळत आहे. काजू ही कोकणाची शान आहे. काजूपासून अनेक पदार्थ बनवले जातात. चाहते आता ऐश्वर्या नारकर यांच्या आगामी प्रोजक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.