Road Accident : उभ्या कारला पाठीमागुन दुचाकी धडकुन दोन जण गंभीर जखमी, आडुळ शिवारातील धुळे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील घटना
esakal April 16, 2025 05:45 AM

आडुळ : टायरची हवा चेक करण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला पाठमागुन भरधाव वेगाने येणारी दुचाकी धडकल्याने कार उभी करून टायर चेक करित असलेल्या कार चालकाला दुचाकीने जोराची धडक दिली यात कार चालकासह दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाची घटना मंगळवारी (ता. १५) रोजी सांयकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली. रामप्रसाद गायकवाड व योगेश ढाकणे असे गंभीर जखमींचे नाव आहे.

योगेश भागवत ढाकणे वय ३८ वर्षे राहणार अंतरवाली खांडी ता. पैठण हे कार क्रमांक एम एच ४६ एक्स ९९४१ ने आणखीन दोन मित्रांसह धुळे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर आडुळ कडून अंतरवाली खांडी कडे जात होते. परंतु त्यांना कार च्या टायर मध्ये हवा कमी झाल्याची शंका आल्याने ते आडुळ जवळ रस्त्याच्या कडेला कार उभी करून हवा चेक करण्यासाठी एकटेच कारच्या खाली उतरून पाठीमागे जात असतांना अचानक त्यांच्या पाठीमागुन दुचाकी क्रमांक एम एच २१ १४८४ ने त्यांना उडवून कारला पाठीमागुन धडकली यात दुचाकीस्वार रामप्रसाद अंकूश गायकवाड वय ३५ वर्षे राहणार रामसगाव (ता . घनसावंगी ) हा व कार चालक योगेश भागवत ढाकणे हे गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच आडुळ येथील सौरभ पिवळ यांनी साहिल शेख, सुरेश पिवळ, संभाजी पिवळ, बिट जमादार अफसर बागवान, राम थोरात यांच्या सहकार्याने स्वतःच्या वाहनात जखमी योगेश भागवत ढाकणे यास उपचारासाठी हलविले तर १०३३ रुग्णवाहिकेत रामप्रकाश गायकवाड यांना नेण्यात आले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असुन पुढिल तपास पाचोड पोलिस करित आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.