हॅरी पॉटर सीरिजसाठी 30 हजार ऑडिशन्स
Marathi April 16, 2025 12:44 PM

जगप्रसिद्ध हॅरी पॉटरच्या आगामी सीरिजचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. सीरिजमध्ये कोण काम करणार आहेत, याची प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून उत्सुकता आहे. अखेर प्रतीक्षा संपली आहे. एचओबीने सोमवारी हॅरी पॉटरच्या नव्या सीरिजमधली कलाकारांची नावे निश्चित केली. एवढेच नव्हे तर त्यासाठी 30 हजारांहून अधिक ऑडिशन्स घेतल्या. त्यातून एल्सब डंबलडोर, सेवेरस स्नेप, मिनर्वा मॅकगोनागल यांच्या भूमिका कोण करणार ते ठरलंय. ‘द क्राऊन’ सिनेमात दमदार अभिनय करणारा जॉन लिथगो आता एब्लस डंबलडोरची भूमिका करेल. अभिनेत्री जेनेट मॅकटीर साकारणार आहे प्रा. मॅगगोनागलची भूमिका! पापा एस्सीडयू सहस्यमय स्नेप आणि निक फ्रॉस्ट हा सर्वांचा आवडता हॅग्रिड हे पात्र साकारेल. आतापर्यंत हॅरी पॉटर फिल्म फ्रेंचायसीचे आठ चित्रपट आले आहेत. त्यातील आठवी फिल्म 2011 साली प्रदर्शित झाली होती. यामध्ये हॅरी पॉटरची भूमिका डॅनियल रॅडक्लिफने साकारली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.