चांगले पालक व्हा! मुलांना आई-वडिलांकडून काय अपेक्षा असतात?
esakal April 16, 2025 05:45 AM
शिस्त

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात. यात मुलांनी हसत खेळत राहावं पण शिस्तही बाळगावी, चार माणसात, नातेवाईकांमध्ये गेल्यावर हुशार आणि गुणी मुलासारखं वागावं असं प्रत्येक पालकाला वाटतं.

पालक

पण पालक म्हणून आपण त्यांच्याशी कसं वागायचं? मुलांच्या पालक म्हणून आपल्याकडून काय अपेक्षा असतात? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.

प्रोत्साहन

मुलांनाही आपल्या पालकांमध्ये काही बदल म्हणा किंवा behavioural changes हवे असतात जसे की, patience म्हणजे अधिक संयम, understanding म्हणजे समजूतदारपणा, acknowledgement and Trust म्हणजेच प्रोत्साहन आणि विश्वास हे हवं असतं.

गप्पा

पालकांनी आपल्यासोबत अधिक मोकळा वेळ घालवावा, चांगल्या गप्पा माराव्यात, सोबत खेळ खेळावेत, त्यासाठी अधिकाधिक वेळ घालवावा असं प्रत्येक मुलाला वाटत असतं.

पालक

याशिवाय, पालकांनी लहान निवडी करण्यासाठी आपल्यावर विश्वास ठेवावा असंही वाटतं, जेणेकरून मुलं कोणत्याही नियंत्रणाशिवाय त्यांच्या आवडी निवडी, छंद, आणि स्वातंत्र्य जाणून घेऊ शकतील.

तुलना

टीकेपेक्षा कुणालाही प्रोत्साहित केलं तर भारीच वाटतं. त्यात पालकांनी जर इतर मुलांशी किंवा मित्र-मैत्रिणींशी, भावंडांशी तुलना केली तर ती मुलांना अजिबात आवडत नाही.

आवडीनिवडी

त्यामुळे तुम्हीही तुमच्या मुलांची इतर मुलांशी तुलना करत बसण्यापेक्षा आपल्या मुलाची Strength ओळखा, आवडीनिवडींना प्राधान्य द्या.

आई

मुलांशी वागताना संयम बाळगा. म्हणजे मुलं तुमच्याशी काही बोलत असतील तर त्यात व्यत्यय न आणता लक्षपूर्वक ऐका. आई-बाबांनी एखाद्या गोष्टीवर React करण्यापेक्षा त्यांनी आपलं म्हणणं ऐकून घ्यावं एवढी माफक अपेक्षा मुलांची असते.

संवाद

मुलांना असं वाटत असतं की, आपण जरी घरात लहान असलो तरी, आपल्या पालकांनी आपल्या मताचा आदर करावा. यामुळे काय होईल? तर मुलांना रिजेक्शन किंवा अन्याय होण्याची भावना येणार नाही आणि ते कुठल्याही गोष्टीची चिंता न करता मुक्तपणे संवाद साधू शकतील.

अभ्यास

बहुतेक मुलांना अभ्यास कमी आणि खेळायला जास्त आवडतं. पण पालक म्हणून आपण मुलांच्या शाळेतील ग्रेडवर लक्ष देतो आणि त्यावरुन मुलांच्या भाषेत सांगायचं तर लेक्चर झाडत बसतो.

मनमोकळेपणा

पालक म्हणून आपण फक्त मुलांच्या शाळेतल्या ग्रेडवरच नव्हे तर, खेळातील कामगिरीकडेही लक्ष दिलं पाहिजे, अशी मुलांची इच्छा असते. शिवाय, मुलांशी मनमोकळेपणानं गप्पा मारा. जेणेकरुन त्यांना ऐकता येईल, समजून घेता येईल आणि घरगुती निर्णयांमध्ये सहभागी होता येईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.