व्यापक गुन्हा: मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील रिंग रोड परिसरात एका स्पा सेंटरच्या सुरू असलेलं देह व्यापाराचे रॅकेट उघडकीस आलं आहे. लातूर पोलिसांच्या अँटी ह्यूमन ट्राफिकिंग युनिटने स्पा सेंटरवर धडक कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे. यात महिलांना जबरदस्तीने अनैतिक धंद्यात ढकळण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर यातील चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात सध्या पोलिसांनी एकूण सहा लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. (sex racket in Spa Centre)
लातूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील रिंग रोड भागात एका स्पा सेंटरमध्ये देह व्यापार सुरू असल्याची माहिती लातूर पोलिसांना मिळाली होती. याबाबत खात्री करण्यासाठी पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवला. ही माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शुक्रवारी लातूर पोलिसांनी स्पा सेंटरवर धडक कारवाई करत तीन जणांना अटक केली. आरोपींच्या चौकशीत काही महिलांना सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ओढून अनैतिक धंद्यात ढकलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले. यानंतर चार महिलांना अँटी ह्यूमन ट्राफिकिंग पथकाने सोडवले. या प्रकरणात आत्तापर्यंत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तीन जणांना अटक झाली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अन्य राज्यांमधून महिलांना स्पा सेंटरवर आणले जात होते. महिलांना सक्तीने या धंद्यात उतरवले जात असल्याचे समोर आले आहे. लातूर पोलीस सध्या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे का? हे सेक्स रॅकेट स्थानिक पातळीवरच मर्यादित नसून त्याचे धागेदोरे अन्य राज्यांपर्यंत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. स्पा सेंटरच्या अवैध धंद्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले(Ranjeet Kasle) यांनी केला आहे. वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) बोगस एन्काऊंटरसाठी आपल्याला 5-10 कोटींपासून ते 50 कोटींची ऑफर दिली जाते, असेही कासले यांनी म्हटले. रणजीत कासले यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा:
अधिक पाहा..