निवडणुका येतात तेव्हा हिंदूंच्या घरांवर हल्ले होतात; नवनीत राणा प. बंगालमध्ये जाणार
Marathi April 14, 2025 11:24 PM

ठाणे : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे वक्फ बोर्ड विधयेकावरुन हिंसाचार उफळला असून केंद्रीय सुरक्षा दलही येथे तैनात करण्यात आलं आहे. येथील हिंसाचाराच्या घटनेवरुन भाजप नेते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करत आहेत. प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यानेच येथील हिंसाचाराला बळ मिळाल्याचा आरोप प.बंगालमधील भाजप नेत्यांनी केला आहे. आता, भाजपच्या महिला नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा (नवनीत राणा) यांनी देखील ममता बॅनर्जी सरकारला लक्ष्य केलं आहे. तसेच, आपण पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जी यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असेही राणा यांनी म्हटलं आहे.

नवनीत राणा भिवंडीतील बागेश्वर धाम मंदिरात आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, देशात हिंदुराष्ट्र बनवण्याचा संकल्प गुरुजींचा आहे, त्याला मदत करण्याची भूमिका आमची आहे. धीरेंद्र शास्त्री महाराज जे काम करीत आहेत हिंदू राष्ट्र म्हणून त्यांनी जो प्रण केला आहे, त्यासोबत आमच्या सारखे भक्त जोडले गेलो आहोत. त्यांच्या सोबत लाखो भक्त, युवक, राजकीय लोक जोडली गेली आहेत. गुरुजींच्या या लढ्यात आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे सांगण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आले आहे, असे नवनीत राणा यांनी म्हटले. दरम्यान, यावेळी पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांवरही त्यांनी भाष्य केलं. पश्चिम बंगालमध्ये जाऊन आम्ही हिंदुत्ववादी ममता दीदींना त्यांची जागा दाखवून देऊ, असे नवनीत राणा यांनी म्हटलं.

पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असल्यापासून ममता दीदी यांनी हिंदूंवर अत्याचार केले आहेत. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हिंदूंच्या घरांवर हल्ले केले जातात. जेणे करून हिंदुत्ववादी विचारांना रोखता येईल. हिंदुत्वाला विरोध करून एवढे वर्ष ममता दीदी सत्तेवर बसल्या आहेत. बांगलादेशा जसे हिंदूंना हाकलून दिले जाते, पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीसुद्धा तसे करू पाहत आहेत. पण, आता देशात हिंदुत्व विचारांचे सरकार आहे. त्यामुळे, त्यांचा प्रयत्न अपयशी होणार आहे. गरज पडली तर हजारो हिंदुत्व विचारांचे कार्यकर्ते पश्चिम बंगाल येथे जाऊन ममता दीदी यांना त्यांची जागा दाखवतील, असे म्हणत राणा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे यांनासुद्धा सत्तेत येण्याची घाई झाली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होत, या वक्तव्यावर विचारले असता घमंड चांगल्या चांगल्यांना ताळ्यावर आणून सही रस्त्यावर येण्यापासून रोखतात, असे राणा यांनी म्हटले. तसेच, उद्धव ठाकरे  यांच्यामध्ये मोठा घमंड आहे, त्यांना रामभक्त कधी पचनी पडत नाहीत, असे म्हणत उद्धव ठाकरेंवरही टीका केली.

हेही वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.