भारतातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींची यादी समोर, पहिल्या स्थानावर ‘या’  उद्योगपतीचं नाव तर…
Marathi April 14, 2025 11:24 PM

भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत श्रीमंत व्यक्तींची संख्या देखील वाढतेय. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीसंदर्भातील माहिती समोर आली आहे. फोर्ब्सनं 1  एप्रिल 2025 पर्यंतच्या वित्तीय आकडेवारीनुसार देशातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीतील टॉप 10 श्रीमंतांची यादी आपण पाहणार आहोत. तर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर, दहाव्या स्थानावर उदय कोटक आहेत. 

1-मुकेश अंबानी

फोर्ब्सच्या यादीनुसार पहिल्या स्थानावर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक 1,000,122 कोटी म्हणजेच 119.9 अब्ज डॉलर्स या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्स गॅस, पेट्रोकेमिकल्स, टेलिकॉम, रिटेल सह इतर क्षेत्रातकार्यरत आहेत. मुकेश अंबानी यांची मुलं आकाश , ईशा आणि अंनत अंबानी  विविध व्यवसाय पाहत आहेत. 

2-गौतम अदानी  

गौतम अदानी हे अदानी ग्रुपचे चेअरमन आहेत, जे भारतात पोर्ट, एअरपोर्ट, ऊर्जा आणि ग्रीन एनर्जी या क्षेत्रात काम करते. गौतम अदानी देशातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. 

3. सावित्री जिंदाल आणि कुटुंब

भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सावित्री जिंदाल पहिल्या स्थानावर असून त्या ओपी जिंदाल ग्रुपच्या चेअरमन आहेत. त्यांची चारी मुलं व्यवसाय पाहतात. जिंदाल ग्रुप स्टीलपासून स्पोर्टसमध्ये कार्यरत आहे. याशिवाय राजकारणात देखील आहेत.

4-शिव नादर

भारतातील आयटी क्षेत्रात शिव नादर यांचं नाव मोठं आहे. त्यांनी एचसीएल कंपनीची स्थापना केली आहे. 2023 मध्ये त्यांनी 2042 कोटी रुपयांचं  दान केलं होतं. भारत सरकारनं त्यांना 2008 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी शिव नादर यांनी त्यांची संपत्ती मुलगी रोशनी नादरच्या नावावर केली होती. 

5- दिलीप संघवी

सन फार्मास्युटिकल्सचे  दिलीप संघवी देशातील पाचवे श्रीमंत व्यक्ती आहेत. भारतातील फार्मा क्षेत्रात त्यांचं नाव आहे. 20214 मध्ये त्यांनी रॅनबॅक्सीचं 4 अब्ज डॉलर्समध्ये अधिग्रहण करुन या क्षेत्रातील स्थान भक्कम केलं आहे. 

6. सायरस पुनावाला

सीरम इन्स्टिट्यूट जगातील लस निर्मिती क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. करोनाच्या काळात लसीची मागणी वाढल्यानं पुनावालांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. 

7. कुमार मंगलम बिर्ला

बिर्ला सिमेंट, अॅल्युमिनिअम, वित्तीय क्षेत्रात काम करते. वीआयमध्ये 18 हजार कोटींच्या एफपीओनंतर कुमार मंगलम बिर्ला बोर्डात आले आहेत. ते भारतातील सातवे श्रीमंत व्यक्ती आहेत. 

8. राधाकिशन दमानी

राधाकिशन दमानी यांनी 2002 मध्ये डीमार्टची स्थापना केली होती. भारतात सध्या 330 डीमार्टचे स्टोअर आहेत. याशिवाय वीएसटी आणि इंडिया सिमेंटसमध्ये भागीदार आहेत. ते आठव्या स्थानावर आहेत. 

9.लक्ष्मी मित्तल

स्टील उद्योगातील मोठं नाव म्हणून लक्ष्मी मित्तल यांची ओळख आहे. यांच्या कंपनीनं 2019 मध्ये एस्सार स्टील 5.9 अब्ज डॉलर्सला खरेदी केल होतं. 

10. उदय कोटक

कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक भारतातील श्रीमंतांच्या यादीत दहाव्या स्थानावर आहेत. जय कोटक लवकरच उदय कोटक यांचे उत्तराधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडतील.  

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.