मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील भांडवली बाजारांमध्ये उलथापालथ सुरु असताना भारतातील प्रमुख खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. HDFC बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली आहे. HDFC बँकेत आता बचत खात्यात पैसे ठेवल्यास ग्राहकांना 2.75 टक्के इतकेच व्याज मिळणार आहे. HDFC बँकेने बचत खात्याचा व्याजदर ICICI आणि Axis बँकेतील बचत खात्याच्या व्याजदरापेक्षा कमी केल्याने ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे बचत खात्यात पैसे साठवून ठेवणे हे फारसे फायदेशीर नसेल.
HDFC बँकेने बचत खात्याच्या व्याजदरात 25 बेसिस पॉईंटने कपात केली, त्यामुळे हा व्याजदर 2.75 टक्के इतका झाला आहे. 12 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर बँकांकडून आपल्या निधी खर्चात कपात करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. HDFC बँकेच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने यंदाच्या वर्षात रेपो दरात सलग दुसऱ्यांदा कपात केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जून 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात बाजारपेठेत मोठ्याप्रमाणावर रोख तरलता (Cash Liquidity) असूनही HDFC बँकेने बचत खात्यांवरील व्याजदर घटवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा एचडीएफसी बँकेने बचत खात्यावरील व्याजदर घटवला आहे. याविषयी ग्राहक आणि आर्थिक विश्वास काय पडसाद उमटतात, हे पाहावे लागेल.
एचडीएफसी बँकेच्या या निर्णयामुळे आता त्यांचा बचत खात्यावरील व्याजदर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेच्या व्याजदराच्या आसपास पोहोचला आहे. या दोन्ही बँका गेल्या दोन वर्षांपासून बचत खात्यावर फक्त 2.70 टक्के व्याज देत आहेत. तर बँक ऑफ बडोदात बचत खात्याचा व्याजदर 2.75 टक्के इतका आहे. HDFC बँकेने 2023 मध्ये HDFC लिमिटेडचे अधिग्रहण केले होते. तेव्हापासून बँकेचा डिपॉजिट बेस और क्रेडिट डिपॉजिट रेशोमध्ये मोठी तफावत निर्माण झाली होती. जुलै 2023 मध्ये सीडी रेशो 100 टक्क्यांच्या वर गेला होता, तो आता 98 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मात्र, पूर्वीच्या 85-87% या स्तरापेक्षा आताचा सीडी रेशो जास्त आहे.
HDFC बँकेने बचत खात्यांवरील व्याजदर घटवल्याने बाजारपेठेत अधिक भांडवल येईल, असे घडणार नाही. कारण अलीकडच्या काळात ग्राहकांना बचत खात्याच्या व्याजदरांशी फारसे देणेघेणे नसते. मात्र, यामुळे बँकेच्या एकूण निधीत कपात होऊ शकतो. कारण HDFC बँकेकडे असणाऱ्या एकूण डिपॉझिटमध्ये 34 टक्के CASA खात्यांचा समावेश आहे. त्यापैकी 69 टक्के रक्कम ही बचत खात्यांमधील आहे. हा आकडा जवळपास 6 लाख कोटींच्या घरात आहे.
https://www.youtube.com/watch?v=r-uhwkcukwq
आणखी वाचा
अधिक पाहा..