मुंबई : अजित पवार यांनी काही आमदारांना सोबत घेत दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार ही काका-पुतण्याची जोडी पुन्हा एकत्र येईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण 10 एप्रिल रोजी अजित पवार यांचे धाटके चिंरजीव जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने शरद पवार यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यानंतर दोन दिवसांनी साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते चक्क एकमेकांच्या बाजूला बसल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर आता पुन्हा एकदा काका-पुतण्याची जोडी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार आहे. त्यामुळे सध्या शरद पवार आणि अजित पवार यांचीच राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. (Sharad Pawar and Ajit Pawar will come together for the third time in 11 days)
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली होती. यानंतर हळूहळू पवार कुटुंबात देखील वितुष्ट निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने राजकीय मतभेद विसरून पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील फार्महाऊसवर जय पवार यांचा ऋतुजा पाटील यांच्याशी 10 एप्रिल रोजी साखरपुडा पार पडला. या सोहळ्याचे फोटोआणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यातील एका फोटोत अजित पवार हे शरद पवार यांनी आणायला फार्महाऊसच्या गेटपर्यंत गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव पार्थ पवारही होते. यानंतर दोन दिवसांनी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांच्या बाजूला बसल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे पुढील काही काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकदा आणखी एका कार्यक्रमात एकत्र येणार आहेत.
हेही वाचा – मराठी : मुख्यमंत्रीपद न मिळाल्याचं शल्य; शिंदे पुन्हा म्हणाले, मी त्या विमानाचा पायलट होतो अन्…
येत्या 21 एप्रिल रोजी पुण्यातील साखर संकुल येथे एआय (AI) संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी सकाळी 9 वाजता बैठकीचे आयोज करण्यात आले आहे. या बैठकीसाठी शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. महत्त्वाचे 11 दिवसात शरद पवार आणि अजित पवार हे तिसऱ्यांदा एकत्र येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल म्हणाले होते की, महाराष्ट्राच्या विकासासाठी जर दोन्ही नेते एकत्र येत असतील तर त्यात काही चुकीचं नाही. प्रफुल पटेल यांच्या वक्तव्यामुळेही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – Polio Vaccine : पोलिओचा डोस घ्यायला पाकिस्तानींचा नकार, यापेक्षा तालिबानी परवडले… आरोग्य मंत्री हताश