इंडिया क्रूड आयात किंमत कमी: भारतात (India) आयात करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमतीत (Crude oil Price) गेल्या पाच वर्षांतील सर्वात मोठी घसरण झाली आहे. सध्या देशात कच्च्या तेलाची आयात करण्याची सरासरी किंमत प्रति बॅरल 70 डॉलरपेक्षा कमी आहे. कच्च्या तेलासाठी इतके कमी पैसे मोजावे लागण्याची 2021 नंतर ही पहिलीच वेळ आहे. सोमवारी ब्रेंट क्रूड 65 डॉलरच्या खाली घसरले आहे. त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाच्या आयातीची सरासरी किंमत प्रति बॅरल 69.39 डॉलर होती, जी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 89.44 डॉलरच्या किंमतीपेक्षा 22 टक्के कमी आहे.
येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत जागतिक वाढ मंदावल्याने आणि व्यापार युद्धाच्या तणावादरम्यान मागणीत घट झाल्यामुळे आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. तेल कंपनीचे अधिकारी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. भारत 87 टक्क्यांहून अधिक प्रक्रिया केलेले कच्चे तेल आयात करतो. तसेच, शुद्धीकरण व्यवसायात कच्चे तेल हा प्रमुख कच्चा माल आहे, ज्याचा एकूण खर्चाच्या जवळपास 90 टक्के वाटा आहे.
गोल्डमन सॅक्स या वर्षी कच्च्या तेलाची सरासरी किंमत 63 डॉलर प्रति बॅरल राहण्याची अपेक्षा आहे. तेल निर्यातदार देशांची संघटना असलेल्या ओपेकने या वर्षी आणि पुढील वर्षी तेलाची मागणी कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. 2025 आणि 2026 साठी मागणी वाढीचा अंदाज दररोज सुमारे 100,000 बॅरलने कमी केला आहे. दरवर्षी 1.3 दशलक्ष बॅरल्सची मागणी कमी होण्याची शक्यता आहे.
पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याची घोषणा करताना, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी 7 एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, तेल कंपन्यांनी 45 दिवसांचा साठा ठेवला होता. ज्याची किंमत प्रति बॅरल 75 डॉलर आहे. जेव्हा त्याची किंमत प्रति बॅरल 60 ते 65 डॉलरपर्यंत घसरते, तेव्हा तेल कंपन्यांकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा पर्याय असणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..