मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणखी सुरक्षित, कंपनीने केले ‘हे’ मोठे बदल
GH News April 15, 2025 06:10 PM

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने अपडेटेड ग्रँड विटारा लाँच केली असून त्याची एक्स-शोरूम किंमत 11.42 लाख रुपये आहे. 2025 ग्रँड विटारामध्ये आता नवीन प्रीमियम फीचर्ससह सहा एअरबॅग्स स्टँडर्ड म्हणून देण्यात आल्या आहेत. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे जाहिरात आणि विक्री विभागाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी म्हणाले, “मारुती सुझुकीमध्ये आम्ही नेहमीच आमच्या ग्राहकांचे ऐकतो आणि ग्राहकांच्या मागणीनुसार नियमितपणे आमच्या उत्पादनांची लाइन-अप रिफ्रेश करतो.

अपडेटेड ग्रँड विटारा ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करते, विशेषत: सुरक्षितता आणि आरामाच्या बाबतीत, असंही ते म्हणालेत.

ग्रँड विटारामध्ये सर्व प्रवाशांसाठी भक्कम सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. सर्व मॉडेल्सच्या सर्व व्हेरियंटमध्ये स्टँडर्ड म्हणून 6 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. ग्रँड विटारासाठी स्टँडर्ड सेफ्टी सूटमध्ये हिल होल्ड असिस्टसह इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (ईबीडी) सह फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक, 3-पॉइंट ईएलआर सीट बेल्ट (सर्व सीट), आयसोफिक्स चाइल्ड सीट रिस्ट्रिक्शन सिस्टम आणि बरेच काही समाविष्ट आहे.

अपडेटेड ग्रँड विटारामध्ये नवीन डेल्टा+ स्ट्राँग हायब्रिड व्हेरियंट देखील मिळतो, ज्याची किंमत 16.99 लाख रुपये आहे. नवीन डेल्टा+ व्हेरियंट ग्रँड विटारा स्ट्राँग हायब्रिडच्या झेटा+ आणि अल्फा+ व्हेरियंटसोबतच नवीन झेटा+ (ओ) आणि अल्फा+ (ओ) व्हेरियंटसोबत उभा राहणार आहे.

ग्रँड विटारा स्ट्राँग हायब्रिडच्या रिफाइंड ड्युअल-पॉवरट्रेनमध्ये लिथियम-आयन बॅटरी पॅकद्वारे चालणारे इलेक्ट्रिक मोटर आणि पेट्रोल इंजिन एकत्र केले आहे, जे उत्कृष्ट परफॉर्मन्स ऑफर ऑफर देते.

मागणीनुसार, नवीन ग्रँड विटारा मध्ये मालकी अनुभव वाढविण्यासाठी डिझाइन केलेले अनेक फीचर्स आणि आरामदायक फीचर्स देखील आहेत. नव्या झेटा (ओ), अल्फा (ओ), झेटा+ (ओ) आणि अल्फा+ (ओ) व्हेरियंटमुळे ग्राहकांना आता झेटा आणि अल्फा व्हेरियंटमधील सनरूफमधून निवडण्याचे अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

नवीन ग्रँड विटारा मध्ये ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन अनेक फीचर्स आणि अपडेट्स देण्यात आले आहेत, ज्यात 8-वे ड्रायव्हर-संचालित सीट, 6 एटी व्हेरिएंटसाठी इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, पीएम 2.5 डिस्प्लेसह ऑटो शुद्धीकरण, चांगल्या इंटिरियर लाइटसाठी नवीन एलईडी केबिन लॅम्प आणि चांगल्या केबिन कम्फर्टसाठी रियर डोअर सनशेड्स यांचा समावेश आहे. अपडेटेड ग्रँड विटारा नवीन आर 17 प्रिसिजन कट अलॉय व्हील्सच्या संचासह स्वत: ला वेगळे करते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.