पूजा खेडकर विरोधातील सुनावणी पुढे ढकलली
पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी होणार
पूजा यांच्यावर संघ लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इतर मागासवर्गीय (OBC) आणि अपंगत्व कोट्याअंतर्गत आरक्षण मिळविण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप
Mumbai News: भांडुपच्या विहार तलावात तरुणावर मगरीचा हल्लाभांडुपच्या विहार तलावात तरुणावर मगरीचा हल्ला
तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणावर मगरीने केला हल्ला
अग्निशमन दल आणि पोलीस तसेच एन डी आर एफ चा पथक घटना सही दाखल
Maharashtra Weather: विदर्भात सूर्य कोपला! अकोल्यात तापमानाचा पारा ४३ वरपुणे -
विदर्भात सूर्य कोपला! अकोल्यात तापमानाचा पारा ४३ वर
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पारा ४० पार
चंद्रपूर आणि वाशिम मध्ये ४१.८ अंश सेल्सिअस, अमरावती आणि यवतमाळ मध्ये ४१.४ अंश तापमान
विदर्भाच्या पाठोपाठ मराठवाड्यात सुद्धा तापमान ४० वर
बीड मध्ये ४१.९, परभणी मध्ये ४१.६ तर छत्रपती संभाजीनगर मध्ये ४०.८ अंश तापमानाची नोंद
पुण्यातील लोहगाव भागात सोमवारी ४१.८ अंश तापमानाची नोंद
Pune News: पुणे शहरासंदर्भात महिला आयोगाची आज जिल्हाधिकारी कार्याला जनसुनावणीपुणे -
पुणे शहरासंदर्भात महिला आयोगाची आज जिल्हाधिकारी कार्याला जनसुनावणी
महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर घेणार जन सुनावणी
जन सुनावणीसाठी जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त व इतर अधिकारी राहणार उपस्थित
नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी जन सुनावणीचा आयोजन
अकरा वाजता सुरू होणार जिल्हाधिकार्यालयात जन सुनावणी
Jalgaon News: सात्री येथे शासकीय जागेवर बेकायदा खोदकाम, शेतकऱ्याविरोधात गुन्हाजळगाव -
सात्री येथे शासकीय जागेवर बेकायदा खोदकाम
शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल
उच्च न्यायालयाच्या अतिक्रमण काढण्याच्या आदेशाचे उल्लंघन
Pimpari Chinchwad: पिंपरीत भटक्या श्वानांवर विषप्रयोग, ६ श्वानांचा मृत्यूपिंपरी चिंचवड-
- पिंपरीत काही भटक्या श्वानावर विषप्रयोग करण्यात आलाय
- पैकी 6 श्वानांचा मृत्यू झाला
- श्वान प्रेमींच्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- महेंद्रा ॲनथिया सोसायटी पिंपरी येथील सोसायटीच्या आवारातील 12 श्वान विषप्रयोग करण्यात आला. यापैकी 6 श्वानाचा मृत्यू झाला आहे.
- श्वानप्रेमी प्रिया गुगळे यांनी याबाबत संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बँकांमध्ये पैशांची टंचाईनंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बँकांमध्ये पैशांची टंचाई
बँकेत कॅश मिळत नसल्याने नागरिक हैराण
घरकुल योजनेचे पैसे अकाउंटला आल्यामुळे पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी
गेल्या महिन्याभरापासून बँकांमध्ये पैसे नसल्याच्या तक्रारी
बँकेमध्ये केवळ एका व्यक्तीला पाच हजार रुपये कॅश दिली जात असल्याची माहिती
बँकेतून जास्तीचे पैसे न मिळत असल्यामुळे धडगाव तालुक्यात रोकड ची अडचण
गेल्या अनेक दिवसांपासून एटीएम मध्ये पैसेच नाही
Raigad News: कर्जतच्या दहिवलीमध्ये घरफोडीचा प्रयत्न; चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैदकर्जतच्या दहिवलीमध्ये घरफोडीचा प्रयत्न; चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद
कर्जत शहरा लागत असलेल्यात दहिवली येथे रात्री घरफोडीचा प्रयत्न झाला. मध्यरात्री साडेतीन वाजताची हि घटना असून कुलूप तोडताना घरातील माणस जागे झाल्याने चोर तेथुन पसार झाले. चोरट्यांचा हा प्रताप CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दहिवली येथील विनायक अंगण या इमारतील हि घटना आहे.
Pune News: केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या रेशन प्राधान्य योजनेतील निकष तपासले जाणारकेंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या रेशन प्राधान्य योजनेतील निकष तपासले जाणार
त्यासाठी राज्य समिती गठित करण्यात आली
समिती दोन महिन्यात अहवाल सादर करणार
येणाऱ्या धान्यापैकी धान्य हे शिल्लक राहत आहे
ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील लाभार्थ्यांचे उत्पन्नाचे निकष तपासले जाणार आहेत
दोन महिन्यात समिती देणार अहवाल
Pune News: राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यात भरवली युवा संघर्ष निर्धार परिषदराष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यात भरवली युवा संघर्ष निर्धार परिषद
अध्यक्ष महादेव जानकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तमे मेळाव्याच आयोजन
मेळाव्याला बच्चू कडू आणि राजू शेट्टी राहणार उपस्थित
फुले वाड्याजवळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल आहे
२० तारखेला महादेव जानकर यांचा ५० वा वाढदिवस
Pune News: राज्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यतापुढील पाच ते सहा दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता
तसेच किमान तापमानही सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा उन्हाचा चटका, उष्मा सहन करावा लागणार आहे.
हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच गुजरात, राजस्थानसारख्या उत्तरेकडील राज्यांमध्येही तापमान वाढले आहे.
त्यामुळे तिकडून उष्ण वारे येत आहेत.
Delhi News: 30 एप्रिलला दिल्लीत होणार आंबा महोत्सवाचे आयोजनआता दिल्लीत होणार आंबा महोत्सवाचे आयोजन
30 एप्रिल रोजी दिल्लीत होणार आंबा महोत्सवाचे आयोजन
शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर करणार आंबा महोत्सवाचे आयोजन
30 एप्रिल रोजी दिल्लीत आंबा महोत्सव भरणार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आंबा महोत्सवाचे उद्घाटन
खासदार रवींद्र वायकर यांनी दिली माहिती
Pune News: MPSC आंदोलनांचं एक शिष्टमंडळ आज मुंबईत आयोगाला जाऊन भेटणारMPSC आंदोलनांचं एक शिष्टमंडळ आज मुंबईत आयोगाला जाऊन भेटणार
पुण्यातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
शरद पवारांच्या भेटीदरम्यान आयोगाच्या अध्यक्षांकडून फोनद्वारे मंगळवारच्या भेटीची वेळ मिळाली होती
आजच्या या भेटीदरम्यान राज्यसेवा पूर्व परीक्षा 45 दिवसांनी पुढे ढकलावी, ही मागणी केली जाणार हे यासोबत कंबाइंड परीक्षेच्या जागा वाढवाव्यात ही देखील मुलांची अनेक दिवसांपासूनची मागणी
दरम्यान पुणे पोलिसांनी एमपीएससीच्या आजच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याची माहिती
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी- नाफेडकडून लवकरच कांदा खरेदीला होणार सुरुवात
- मात्र नाफेडच्या कांदा खरेदीत यंदा मोठा बदल
- मागील वर्षी नाफेडच्या कांदा खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतर नाफेडचा महत्वाचा निर्णय
- यंदा नाफेडने कांदा खरेदीतून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना वगळलं
- आता नाफेड आपल्या सदस्यत्व असलेल्या सहकारी संस्थांमार्फत करणार कांदा खरेदी
- कांदा खरेदीत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नाफेडचा प्रयत्न
- सध्या कांद्याचे दर घसरत असल्यानं नाफेडच्या कांदा खरेदीने कांद्याच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता
Maharashtra News Live Updates : मंत्र्यांच्या शहरात पाणी टंचाईराज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोक उईके यांच्या राळेगावात तब्बल दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केल्या जात आहेत.सध्या कडक ऊन्हाळा सुरू आहेत.अशात दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागतेय.या गंभीर विषयाकडे आदिवासी विकास मंत्री लक्ष देण्याची मागणी होत आहेत.
चार दिवसापासून कृषी पंपाची विज बंद असल्यानं शेतकऱ्याची उन्हाळी पिकं सुकन्याच्या मार्गावर...वाशिमच्या रिसोड तालुक्यातील येवती परिसरात मागील चार दिवसापासून कृषी पंपाची विज बंद असल्यानं शेतकऱ्याची उन्हाळी पिकं सुकन्याच्या मार्गावर आहेत. या परिसरात पैनगंगा नदीवर बॅरेज बांधण्यात आल्यानं मोठया प्रमाणात उन्हाळी मूग, भुईमूग, तीळ या सारखी पिकं घेतली जातात, उन्हाळी मूग सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. मात्र विज नसल्यानं शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळं ही पिकं सुकन्याच्या मार्गावर असून लवकर विज पुरवठा दुरुस्त करुन सुरळीत सुरु नं केल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
देगलूरमध्ये तालावर काढून मारण्याची धमकीनांदेडच्या देगलूर शहरात दुकानासमोरून गाडी काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून तलवारीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडलीय.युनूस गफूर शेख यांच्या मदनूर रोडवरील रिपेरिंग सेंटर समोर हायवा गाडी लावलेली काढण्यास सांगितल्याने हायवा चालकाच्या मित्राने युनूस व त्याच्या भावावर तलवार हातात घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली.पोलिसात दिलेल्या तक्रारीवर सुधाकर कावटवार वर गुन्हा दाखल करण्यात आलाय,मात्र तलवार पाहून परिसरात काही काळ दशदीचे वातावरण निर्माण झाले होते.
संग्रामपूर तालुक्यातील ४४९ जन्म,मृत्यू आदेश रद्द ..बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील भारत शासन राजपत्राद्वारे जन्म मृत्यु नोंदणी कायदा 1969 मध्ये सुधारणा करुन उशिरा जन्म मृत्यु नोंदणी संबंधीचे अधिकार हे जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना प्राधिकृत केलेले होते, यांना प्रदान करण्यात आलेल्या कार्यवाही संदर्भात शासनाकडे मोठया प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.... शासन निर्णयानुसार तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिका-यांनी जन्म-मृत्यु प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहेत ते सर्व प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले आहे.... असे संग्रामपूर तालुक्यातील 449 जन्म,मृत्यू आदेश रद्द करण्यात आले असून कोणते शासकीय योजनेसाठी, लाभासाठी किंवा कायदेशीर कामासाठी ,अथवा नोंदणीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही असे संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी माहिती दिली आहे.
JUNNAR-आवकाळी पाऊस, गारपिठीच्या शेताच्या बांधावरुन आढावाकर्ज काढून, शेतीच्या मातीला सोनं करणं शक्य होईल या आशेने रात्रंदिवस राबलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटोचं पीक उभं केलं होतं. पण आभाळातून आलेल्या गारांनी ही मेहनत काही क्षणांत मातीमोल करून टाकली.टोमॅटो पाण्यात गेला, कष्टाची माती झालीय याआधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी आता आणखी खोल खाईत ढकलले गेले आहेत. "आता नुकसानभरपाई नको, आमचं कर्ज तरी माफ करा!" असा आक्रोश शेतकऱ्यांकडून होतोय कारण नुकसान एवढं प्रचंड आहे की फक्त काही हजारांची भरपाई शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले अश्रू थांबवू शकत नाही. टोमॅटोने उभारी मिळेल, सणवार साजरे होतील, मुलांचं शिक्षण सुरू राहील, अशी स्वप्नं गारपिटीच्या थेंबांमध्ये विरघळून गेली.
हळदी मध्ये फुकट्या पाहूण्याने जेवणावर ताव मारत दागिने केले लंपासवाशी गाव येथे एका हळदी समारंभात आलेल्या फुकट्या पाहूण्याने जेवणावर ताव मारत हळदी समारंभाला उपस्थित इसमाच्या दागिन्यांवरच आपले हात साफ केलेत. परेश पवार हे वाशी गावं येथे एका हळदी समारंभाला उपस्थित होते. यावेळी जेवणाच्या टेबलवर गाडीची चावी विसरल्याने ही चावी घेऊन चोरट्याने परेश यांच्या फॉर्चूनरचा दरवाजा उघडून त्यामध्ये ठेवलेले सुमारे 14 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि 2 मोबाईल फोन चोरी केले. घटना लक्षात येताच परेश यांनी तात्काळ वाशी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलीसांनी देखील तात्काळ तपासाला सुरुवात करत गाडी समोरील सिसीटीव्ही द्वारे आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी अंकुश सलगर हा स्थानिक टॅक्सी चालक असून फुकट जेवण करण्यासाठी आला असताना त्याने हे कृत्य केलेय. वाशी पोलीसांनी आरोपी अंकुश सलगर विरोधात गुन्हा दाखल केला असून सर्व दागिने आणि मोबाईल हस्तगत केलेत.