वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठी आणि शरीर थंड राहण्यासाठी उन्हाळ्यात दही भरपूर प्रमाणात खाल्ले जातात. दह्याचे नियमित सेवन आरोग्यासाठी लाभदायक असते. त्यामुळे उन्हाळ्यात तर विविध पदार्थांसोबत दह्याचा आस्वाद घेतला जातो. पण, आयुर्वेदानुसार असे काही पदार्थ आहेत जे दह्यासोबत वर्ज्य सांगण्यात आले आहेत. कारण दह्यासोबत हे पदार्थ खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन गॅस, अपचन, पोट फुगणे अशा तक्रारी सुरू होतात. एकदरंच, दही खाणे तोपर्यंत फायदेशीर आहे जोपर्यंत तुम्ही दही योग्य पदार्थांसह आणि पद्धतीने खाता. त्यामुळे आज आपण असे दह्यासोबतचे फूड कॉम्बिनेशन जाणून घेऊयात जे खाणं टाळायला हवं.
मासे आणि दही एकत्र खाऊ नये. हे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पचनसंस्थेचे कार्य बिघडू शकते. ज्यामुळे शरीराचे तापमान बिघडते, ज्यामुळे त्वचेची एलर्जी, ऍसिडिटी तक्रारी सुरू होतात. आयुर्वेदातही हे निषिद्द मानण्यात आले आहे.
दही आणि आंबा एकत्र खाल्ल्याने त्वचेची एलर्जी होऊ शकते.
कांदे उष्ण असतात. यात सल्फर कंपाउंड असते. ज्यामुळे दह्यातील थंड गुणाशी प्रतिक्रिया निर्माण करू शकते. त्यामुळे कांदा आणि दही एकत्र खाऊ नये, नाही तर तुम्हाला गॅस, पोटफुगी, छातीत जळजळ यासारख्या समस्या जाणवू शकतात.
दह्यासोबत चुकूनही आंबट पदार्थ खाऊ नयेत. तुम्ही जर लिंबू, आंबट फळे खात असाल तर आत्ताच थांबा. कारण, असे दोन्ही आम्लयुक्त पदार्थ एकत्र खाल्ल्यास पोटदुखी, गॅस होऊ शकते.
दही आणि दुध एकत्र खाऊ नयेत, असे केल्याने आम्लपित्त, छातीत जळजळ, पोट फुगणे सुरू होते.
दही आणि साखर एकत्र खाऊ नये. साखर आणि दही एकत्र खाल्ल्याने पचनसंस्थेची कार्यक्षमता कमी होते. यामुळे अपचन, गॅससारख्या समस्या निर्माण होतात.
हेही पाहा –