महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाने आंतरराष्ट्रीय पंच नीतेश काबलिया यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ते पंच होते. त्यांचा निर्णय वादग्रस्त ठरला होता.
अहिल्यानगर येथे 29 जानेवारी ते दोन फेब्रुवारीदरम्यान 67 वी महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धा र्या झाली झाली होती. यात महाराष्ट्र केसरी गादी विभागातील अंतिम फेरीच्या कुस्तीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात कुस्ती झाली होती. यात राक्षे चीतपटझाल्याचा पंच नीतेश यांचा निर्णय वादग्रस्त ठरला होता.
या निर्णयाच्या विरोधात मल्ल राक्षेने पंचांना मारहाणही केली होती. यानंतर महासंघाने आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली या कुस्तीच्या बाबतीत एक चौकशी समिती स्थापन केली. सदर अहवालानंतर नीतेश यांना पुढील तीन वर्षांसाठी त्यांना राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पंचकार्य करण्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. राक्षेवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ती बंदी उठविण्यात आली आहे.