Maharashtra politics : 'भाजपचे आरएसएससोबत भांडण, बिनाअध्यक्षाचा पक्ष...', यशोमती ठाकूरांनी 'त्या' टीकेवरून सगळच काढलं
Sarkarnama April 16, 2025 01:45 PM

Yashomati Thakur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसला येवढ्याच मुस्लिमांचा कळवळा असेल तर त्यांनी आपला राष्ट्रीय अध्यक्ष मुस्लिम व्यक्तीना बनवावे. निवडणुकीत 50 टक्के तिकीटे मुस्लिमांना द्यावीत, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

ठाकूर यांनी ट्विट करत 'पंतप्रधान यांनी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण असावा याचे फुकटचे सल्ले देण्यापेक्षा आपला स्वत:चा पक्ष भाजपला अजून आताच्या अध्यक्षांचा कार्यकाळ संपून चार महिन्यांचा कालावधी झाला तरी अध्यक्ष निवडता आलेला नाही याकडे लक्ष द्यावे.',असा टोला लगावला.

'संघासोबत सुरू असलेल्या लढाईत ला गेल्या चार पाच महिन्यापासून अध्यक्ष निवडता आलेला नाही त्याकडे मोदींजीनी जरा लक्ष द्यावे. नाहीतर बिन अध्यक्षांचा पक्ष म्हणून भाजप ओळखला जाईल', असे देखील ठाकूर यांनी म्हटले.

यशोमती ठाकूर यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर देखील भाष्य करताना एका तरुणाच्या हत्येवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे. या विषयी ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न संवेदनशील आहे. आज पुन्हा माजलगाव तालुक्यात एका तरुणाची भर दिवसा हत्या झाल्याची घटना घडली आहे. बाबासाहेब आगे असे या तरुणाचे नाव असून तो किटी ग्रामपंचायतीचा सदस्य आणि भाजपचा कार्यकर्ता आहे.

फडणवीसांचा गृहखात्यावर वचक नाही?

राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री भाजपचे असताना राज्यातील भाजपचे कार्यकर्तेच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनता काय सुरक्षित असणार? मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निष्क्रीय कारभारामुळे आज महाराष्ट्रात गुन्हेगार मोकाट आहेत का ? फडणवीसांचा गृहखात्यावर वचक नाही का ? असा सवाल देखील ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

आरएसएसचा प्रमुख मुस्लिम व्यक्तिला करा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील पंतप्रधान मोदींच्या टिकेला प्रत्युत्तर देनाना म्हटले की, भाजपला एवढचा कळवळा असले तर पक्षाच्या अध्यक्षपदी किंवा पंतप्रधान म्हणून मुस्लिम समाजाला संधी द्यावी. सतेच आरएसएसच्या संरसंघचालकपदी महिला किंवा मुस्लिमांना नेमावे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.