नागपूरमध्ये मागच्या महिन्यात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात शांतता नांदावी यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज नागपुरात सद्भावना शांती रॅली काढली जाणार आहे. या सद्भावना शांती रॅलीमध्ये प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व सहप्रभारी कुणाल चौधरी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
Amravati Airport inauguration : अमरावती विमानतळाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणारअमरावती विमानतळाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत. या विमानतळावरून अलायन्स एअर कंपनीची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा आजपासून सुरू होणार आहे.