उन्हाळ्यात साखरयुक्त पेयांऐवजी निवडा घरगुती नैसर्गिक थंडगार पेय आरोग्यदायी, ताजेतवाने आणि फायदेशीर!
भिजवलेल्या चिया सीड्स हायड्रेटेड ठेवतात, शरीर थंड ठेवतात आणि ऊर्जा देतात. कलिंगड रसात मिसळल्यावर पोषणमूल्य वाढते.
कलिंगड, चिया सीड्स हे मिळून प्यायल्याने शरीरात पाणी खूप वेळ राहते आणि उष्णतेपासून संरक्षण करतात.
कलिंगडाचे नैसर्गिक थंड गुणधर्म शरीरातील उष्णता कमी करण्यात मदत करतात.
कलिंगडमध्ये फायबर पचन सुरळीत करतात.
कलिंगडातील नैसर्गिक साखर आणि इलेक्ट्रोलाइट्स शरीराला ऊर्जा देतात. उन्हाळ्यातील एनर्जी बूस्टर आहे हे फळ.
कलिंगडाची ओलसरता त्वचेचा कोरडेपणा, लालसरपणा कमी करून नैसर्गिक ग्लो देतो.
प्रथिने आणि फायबरयुक्त चिया सीड्स + कमी कॅलरीज असतात कलिंगड मध्ये त्यामुळे वजन नियंत्रणासाठी उत्तम आहे.
ताजं कलिंगड बिया काढून कापून घ्या व त्याचा ज्यूस करा. 3 चमचे भिजवलेला चिया सीड्स त्यात घाला. चिमूटभर काळं मीठ, लिंबू, मध घाला. थंडगार सर्व्ह करा!