चंद्रशेखर बावंकुले: बाळासाहेबांचा आवाज वापरुन त्यांच्या विचारांचा द्रोह केला आहे. आज वंदनीय बाळासाहेब असते तर लाथच मारली असती असे म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. बाळासाहेबांचं संपूर्ण आयुष्य ज्याच्या विरोधात गेलं, त्याच विचारांच्या बाजूनं उबाठा गट आहे. असल्याचे बावनकुळे म्हणाले.
धिक्कार असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका केली आहे. आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उबाठासारखा गटच करु शकतो असे बावनकुळे म्हणाले. मला खात्री आहे, आज ज्यांनी बाळासाहेबांना जनाब ठरवले, ज्यांनी टिपू सुलतानाचे नावं उद्यानांना दिली, वीर सावरकरांचा सकाळी अपमान करणार्या राहुल गांधींच्या गळ्यात सायंकाळी गळे घातले, वक्फच्या विरोधात मतदान केले, राममंदिराला सातत्याने विरोध करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, 370 रद्द करणार्याला विरोध करणार्यांना पाठिंबा दिला, वाझेसारख्यांकडून वसुली करवून घेतली, डेडबॉगी बॅगमध्येही घोटाळे केले, कोविड काळात खिचडीत घोटाळे केले, मराठी माणसांच्या घरात घोटाळे करुन गल्ले भरले, त्यांच्या बुडावर बाळासाहेबांनी लाथच घातली असती असे बावनकुळे म्हणाले.
ज्या गोष्टींसाठी वंदनीय बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, किमान त्याच्या विरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरु नये. त्यांचे विचार बुडवलेत. किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर करु नका असे बावनकुळे म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटाचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा पार पडला. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. राज्यातील शिवसैनिकांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न या शिबीराच्या माध्यमातून ठाकरेंकडून करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागातील ठाकरे गटातील कार्यकर्ते शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी आज ठाकरे गटाकडून निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या सुरुवातीला ठाकरे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांचे एआयमार्फत भाषण सादर केल्याचं पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..