छोट्या पडद्यावर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'कोण होतीस तू काय झालीस तू' ही मालिका २८ एप्रिल पासून स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणार आहे.
मालिकेत मंदार जाधव आणि गिरीजा प्रभू हे मुख्य भूमिकेत आहेत.
त्यांच्यासोबत सुकन्या मोने, वैभव मांगले आणि साक्षी गांधीदेखील मालिकेत दिसत आहेत.
नुकतंच या मालिकेचं शूटिंग सुरू झालंय. कोकणातल्या गावात या मालिकेचं शूटिंग सुरू आहे.
या मालिकेचं शूटिंग कोकणातल्या कुडाळ या गावात सुरू आहे.
या मालिकेच्या शूटिंगसाठी मालिकेचा संपूर्ण क्रू कुडाळ येथे दाखल झालाय.
त्यांचं कुडाळ स्टेशनवर जागी स्वागत करण्यात आलं होतं. तर त्यांनी कुडाळमधील वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिराचं देखील दर्शन घेतलं.
काही दिवसांसाठी कुडाळ येथेच हे शुटिंग सुरू असणार आहे.
...म्हणून तुटलेलं अशोक सराफ आणि रंजना यांचं नातं?