मुंबई : जगभरात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यातच आता आयआयटी मुंबईतील संशोधकांनी खारे पाणी गोड करण्यासाठी एक नवीन संशोधन केले आहे. या संशोधनामुळे पाणी संकटाबाबत भविष्यात मोठा दिलासा मिळणार आहे.
‘आयआयटी मुंबई’ येथील संशोधकांनी पाण्याचे विक्षारण अधिक सुकर करणारा नवीन पदार्थ विकसित केला. ‘ड्युएल साइडेड सुपरहायड्रोफोबिक लेझर-इंडूस्ड’ (‘डीएसएलआयजी’) असे या पदार्थाचे नाव आहे. हा पदार्थ पाण्यातील कार्बन उत्सर्जन व विषारीपणा कमी कमी करण्यास उपयुक्त आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आणि दीर्घकाळ चालणाऱ्या विक्षारण प्रक्रियेसाठी आणि औद्योगिक सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी तो वापरता येऊ शकतो. ‘डीएसएलआयजी’ अत्यंत जलविरोधी आहे.
हा पदार्थ कमळाच्या पानाप्रमाणे पाण्याला दूर लोटतो. या गुणधर्मामुळे हा जलविरोधी पदार्थ त्याच्या पृष्ठभागाचे आणि पाण्याच्या थेंबांचे संपर्क क्षेत्र कमी करतो. त्यामुळे पाण्याचे थेंब त्याला ओले न करता त्याच्यावरून घरंगळतात. विक्षारणासाठी उपयोग करताना ‘डीएसएलआयजी’चा अतिजलविरोधी गुणधर्म पाण्यात विरघळलेल्या क्षारांना बाष्पकाच्या पृष्ठभागावर चिकटू देत नाही.
‘आयआयटी’तील प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांनुसार ‘डीएसएलआयजी’ त्याच्या कमळाच्या पानाप्रमाणे असलेल्या गुणधर्मांमुळे क्षार जमा होऊ देत नाही. सौरऊर्जा आणि वीज दोन्ही वापरून उत्तम कार्यक्षमतेने विक्षारण करतो. एवढेच नव्हे तर तो अत्यंत संहत खारे पाणीसुद्धा प्रभावीपणे शुद्ध करतो. म्हणून तो इतर विक्षारण प्रक्रियांमधून निघालेल्या निरुपयोगी खाऱ्या पाण्याला आणि औद्योगिक सांडपाण्याला शुद्ध करण्यासाठी आदर्श आहे. ‘डीएसएलआयजी’चे अनेक बाष्पक जर एकावर एक रचले तर कामगिरी अधिक चांगली होते, असे संशोधकांनी दाखवून दिले आहे. प्रा. स्वतंत्र प्रताप सिंग आणि ऐश्वर्या सी. एल. यांनी यावर संशोधन केले आहे.
जगभरात पाण्याची समस्यागोड्या पाण्याची टंचाई ही जगात अनेक ठिकाणी भेडसावणारी महत्त्वाची समस्या आहे आणि येत्या काही वर्षांत ती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्यातील किंवा मचूळ पाण्यातील क्षार काढून टाकणे (विक्षारण) हा एक उपाय असू शकतो. कार्यक्षम आणि जलदपणे विक्षारण करू शकणारी तंत्रे विकसित करायच्या प्रयत्नात संशोधक आहेत, पण विक्षारणाच्या प्रक्रियेमध्ये निर्माण होणारे ब्राइन (क्षारांचे संहत द्रावण) ही भूवेष्टित (लँडलॉक्ड) जागांसाठी मोठी समस्या आहे. म्हणून द्रव पदार्थ निर्माण न होणाऱ्या प्रक्रियेच्या शोधात औद्योगिक क्षेत्र आहे.
असा तयार केला पदार्थसंशोधकांनी पॉलिएथर सल्फोन (पीईएस) या पॉलिमरच्या पातळ थराच्या एका बाजूवर पॉलिव्हिनिलिडीन फ्लोराईड या दुसऱ्या पॉलिमरचा थर देऊन ‘डीएसएलआयजी’ पदार्थ बनवला. त्यानंतर लेझर-आधारित तंत्रज्ञान (लेसर-बेस्ड एनग्रेव्हिन्ग टेक्नॉलॉजी) वापरून पदार्थाच्या पॉलिव्हिनिलिडीन फ्लोराईड पॉलिमर असलेल्या बाजूवर ग्राफिन वापरून कोरले. अशा प्रकारे या पदार्थाच्या दोन बाजूंना दोन वेगळे पॉलिमर असतात. यावरून तसेच त्याला बनवण्याच्या तंत्रावरून त्याला नाव दिले आहे. ‘पीईएस’ पाण्याला दूर लोटत नाही, पण बाष्पकाला सहजपणे तुटण्यापासून वाचवण्यासाठी तो महत्त्वाचा आहे.
चांगली होते, असे संशोधकांनी दाखवून दिले आहे. प्रा. स्वतंत्र प्रताप सिंग आणि ऐश्वर्या सी. एल. यांनी यावर संशोधन केले आहे.