संपूर्ण कुटुंब बसल्यावरही जागा शिल्लक राहील, ‘ही’ 7 सिटर कार घ्या
GH News April 19, 2025 05:18 PM

सर्वात स्वस्त सेव्हन सीटर कार कोणती? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर कदाचित तुम्हाला उत्तर माहिती नसेल. काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला याचविषयाची माहिती देणार आहोत. विशेष म्हणजे तुमच्या बजेटमध्ये ही सेव्हन सीटर कार आहे. तसेच याचेही फीचर देखील खास आहे. चला तर मग याविषयी जाणून घेऊ या.

तुम्ही बजेट रेंजमध्ये सेव्हन सीटर कारच्या शोधात असाल पण तुम्हाला काहीच समजत नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी मार्केटमधील सर्वात स्वस्त MPV घेऊन आलो आहोत जी दमदार केबिन स्पेस तसेच जबरदस्त सेफ्टी रेटिंग देते. विशेष म्हणजे यात तुमचे कुटुंब संपूर्ण बसेल. त्यामुळे ही सेव्हन सीटर तुमच्यासाठी खास असू शकते.

‘ही’ कोणत्या प्रकारची गाडी?

खरं तर आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत ती रेनॉची ट्रायबर आहे जी MPV आहे. स्वस्त कार असूनही तुम्हाला चांगला लूक आणि फॉरवर्ड फीचर्सही पाहायला मिळतात.

रेनो ट्रायबर किंमत आणि व्हेरियंट

रेनो ट्रायबर RXE, RXL, RXT आणि RXZ या चार व्हेरियंटमध्ये येते. व्हाइट, सिल्वर, ब्लू, मस्टर्ड आणि ब्राउन अशा पाच रंगांमध्ये खरेदी करता येईल. याची किंमत 6.09 लाख रुपयांपासून सुरू होते

डिझाइन आणि फीचर्स कोणते?

यात सुंदर ग्रिल आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आले आहेत, तर बाजूंना काळे आवरण आणि फ्लेयर्ड रियर व्हील कमानी आहेत. ट्रायबरमध्ये 625 लीटरची बूट स्पेस देण्यात आली आहे, ज्यासाठी तुम्हाला शेवटच्या रॉच्या सीट बंद कराव्या लागतील. आरएक्सझेडमध्ये AC आणि कूल्ड ग्लोव्हबॉक्स, सेकंड रो व्हेंट, हायट-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, मल्टिपल स्टोरेज स्पेस, ड्युअल फ्रंट ग्लोव्ह बॉक्स आणि अ‍ॅपल कारप्ले/अँड्रॉइड ऑटोसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

रेनो ट्रायबरमध्ये 1.0 लीटर चे तीन सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे जे 72 बीएचपी पॉवर आणि 93 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5-स्पीड एएमटी युनिट देण्यात आले आहे. या व्हेरियंटमध्ये अनुक्रमे 19 किमी प्रति लीटर आणि 18.29 किमी प्रति लीटर ची फ्यूल इकॉनॉमी मिळते.

सुरक्षितता

सुरक्षिततेबद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला 4 एअरबॅग्स (2 फ्रंट, 2 साइड्स) मिळतात. ग्लोबल एनसीएपीने या कारला प्रौढांसाठी 4Star सेफ्टी रेटिंग दिले आहे. तर लहान मुलांसाठी 3Star सेफ्टी रेटिंग देण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.