स्वारगेट डेपो अत्याचार प्रकरणात 893 पानांचे आरोपपत्र दाखल, गुगल हिस्ट्रीतून दत्ता गाडेबाबत धक्क
Marathi April 18, 2025 12:26 PM

पुणे : स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये (Pune Swargate ST Bus Depo) झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे (Datta Gade) याच्याविरोधात 893 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. ए. मकानदार यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल दाखल केले. गुन्हा घडल्यानंतर तब्बल 52 दिवसांत आरोपपत्र दाखल (Pune Swargate ST Bus Depo) करण्यात आले आहे. आरोपपत्रामध्ये 82 साक्षीदार तपासून पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवले आहेत. या प्रकरणी एकूण बारा पंचनामे करण्यात आले असून, पाच महत्त्वाच्या पंचनाम्यांतून आरोपी गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचे थेट व घटनेतील भक्कम पुरावे आरोपपत्रात सादर करण्यात आले आहेत.(Pune Swargate ST Bus Depo)

अत्याचार प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. गाडेने गुन्हा केल्यानंतर तो त्याच्या मुळगावी गुनाट गावामध्ये (Pune Swargate ST Bus Depo) लपून बसला होता. पुणे पोलिसांनी गुनाट गावातील ग्रामस्थांच्या मदतीने तीन ड्रोन कॅमेरे, श्वान पथकांच्या मदतीने आणि गाडेला ताब्यात घेतलं. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला 12 दिवस पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार गाडेची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.(Pune Swargate ST Bus Depo)

या प्रकरणी तपास अधिकारी शैलेश संखे यांच्या पथकाने आरोपी दत्ता गाडेच्या विरोधात पुरावे जमा केले. त्यानंतर सरकारी वकील भाग्यश्री डागळे-संचेती यांच्यामार्फत  893 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात 82 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली असून, न्यायालयात पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एकूण 12 पंचनामे केले आहेत. या प्रकरणामध्ये गुगल सर्च, आरोपीचे लोकेशन, शिवशाही बसमधील तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही आणि निवेदन या पाच महत्त्वाच्या पंचनाम्यातून आरोपीविरुद्ध पुरावे सादर करण्यात आले आहेत. स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय 37, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना 25 फेब्रुवारी रोजी पहाटे पावणेसहा ते पावणेसातच्या दरम्यान घडली होती.

तपासातील कोण-कोणते मुद्दे आले समोर?

– शिवशाही बसमध्ये अत्याचार झालेल्या घटनास्थळावर दोघांचे केस व आरोपीच्या शर्टाचे बटण सापडले असून, रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासणीत ते आरोपी गाडेचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे.
– आरोपी दत्ता गाडे गुन्ह्याच्या दिवशी स्वारगेट बसस्थानकात पहाटेपासून असल्याचे दिसत होता, तसेच तो पीडितेशी बोलत होता,  पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी बोलताना पाहिले असून, त्यांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले आहेत.
– आरोपी गाडे लैंगिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल ससून रुग्णालयाच्या तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
– पीडितेने या अत्याचाराबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांना माहिती देऊन आरोपी गाडेचा शोध घेण्याची विनंती केली होती. या चालक-वाहकांना शोधून पोलिसांनी त्यांचे जबाव न्यायालयात नोंदवण्यात आले आहेत.
– स्वारगेट एसटी स्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी गाडे घटनास्थळी हजर असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात नमूद आहे.
– आरोपीच्या मोबाइल नंबरवरून सायबर तज्ज्ञांमार्फत त्याची गुगल सर्च हिस्टरी तपासली. त्यामध्ये आरोपी गाडे वारंवार अश्लील व्हिडिओ पाहात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गुगल सर्च हिस्टरी पंचनामा करण्यात आला.
– ओळख परेडमध्ये पीडित तरुणीने आरोपी गाडेला ओळखले आहे.

पोलिसांनी प्रथमच गुन्ह्याच्या तपासात तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी पंचनामा केला. त्यामध्ये शिवशाही बसमधून आवाज बाहेर येतो का, याची ध्वनी तंत्रज्ञांमार्फत पडताळणी करण्यात आली. मात्र आवाज बाहेर येत नसल्याचे तोडफोडीतून समजले आहे. गाडेचा फोन अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी प्रथमच गुगल सर्च हिस्टरी आणि सीसीटीव्ही पंचनामा करून आरोपी गाडे गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचे शोधून काढले.

आरोपीचा डीएनए जुळला

पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांमध्ये आरोपी दत्ता गाडेचा डीएनए जुळला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावर त्या बसमध्ये दोघांचेही केस सापडले आहेत. त्याच्या शर्टाचे बटनही पोलिसांना बसमध्ये सापडले आहे. गुन्हा करताना घातलेला शर्टही पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणात एसटी महामंडळ कर्मचारी, कॅबचालक, रिक्षाचालक त्याबरोबरच वैद्यकीय अहवाल त्याबरोबरच ओळख परेड हे महत्त्वाचे पुरावे आरोपपत्रासोबत लावण्यात आले आहेत. पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचीही परवानगी न्यायालयाकडून घेतली आहे.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.