(Marathi Vs Hindi) मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार आता पहिलीपासून इंग्रजीसह हिंदी भाषेचीही सक्ती करण्यात आली आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, मुंबईसह महाराष्ट्राला हिंदीपेक्षा गुजरातीपासून सर्वात जास्त धोका असल्याचा दावा केला. त्याचबरोबर याबाबत ‘कॅफे’त चर्चा का होत नाही? असा प्रश्न करत राज ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे. (Sanjay Raut claims that biggest threat to Maharashtra is from Gujarati)
सविस्तर वृत्त लवकरच