मसूर : वाठार- खराडे रस्त्यावर, बानुगडेवाडीनजीक दुचाकी झाडाला धडकून बेलवाडीतील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. किशोर सर्जेराव फडतरे (वय ३८, रा. बेलवाडी, ता. कऱ्हाड) असे त्यांचे नाव असून, बुधवारी रात्री हा अपघात झाला.
यात्रेनिमित्त किशोर फडतरे पुण्यावरून गावी आले होते. बुधवारी सायंकाळी ते हेळगाव येथे केस कापण्यासाठी गेले होते. ते घरी दुचाकीने वेगाने परत येत होते. बानुगडेवाडीनजीक करडी पुलाजवळ किशोर यांची दुचाकी (एमएच ०५ एवाय ०३४९) रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडाला धडकली.