Maharashtra Board 10th 12th Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीची परीक्षा नुकतीच घेण्यात आली होती. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेच्या निकालाची वाट विद्यार्थी पाहत आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल १५ मे पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु बोर्डाने अधिकृतरित्या निकालाची तारीख अद्याप जाहीर केली नाही.
गेल्या काही वर्षांचा निकालाचा कल पहिल्यावर महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागतात. दहावीचे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जातात. गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला होता. दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर करण्यात आला होता.
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण ३५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना गुणांसह ग्रेड देखील मिळतील. ग्रेडिंग सिस्टीमनुसार, ७५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळणार आहे. ६० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना प्रथम श्रेणी मिळेल. ४५ टक्के ते ५९ टक्के गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय श्रेणी मिळेल. उत्तीर्ण होण्यासाठी ३५ पेक्षा जास्त गुण हवे. ज्या विद्यार्थ्यांना हे किमान गुणही मिळू शकणार नाहीत त्यांना पुन्हा पुरवणी परीक्षेला बसावे लागेल.