आघाडीची IT कंपनी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय,  240 कर्मचाऱ्यांना दिला नाराळ, नेमका का घेतला नि
Marathi April 18, 2025 05:31 PM

इन्फोसिस लेफ: आघाडीची IT कंपनी Infosys ने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीतील तब्बल 240 एंट्री लेव्हल कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना अंतर्गत चाचणी पास करता आली नाही त्यामुळं हा निर्णय घेतला आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये कंपनीने 300 हून अधिक प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. इन्फोसिसने या तरुणांना NIIT आणि UpGrad येथे मोफत कौशल्ये शिकण्याची संधी दिली आहेत, जेणेकरुन ते भविष्यासाठी काहीतरी चांगले करू शकतील.

सध्याच्या बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन कंपनीने हे पाऊल उचलले कारण कमी ऑर्डरमुळे, कंपनीने चालू आर्थिक वर्षात केवळ 0 ते 3 टक्क्यांच्या दरम्यान महसूल वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. हे या क्षेत्रात मंदीचे संकेत देत आहे. किंबहुना, अमेरिका आणि युरोपसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये ग्राहक खर्च कमी करत आहेत. त्यामुळे आयटी सेवा देणाऱ्या कंपनी इन्फोसिसला कमी करार मिळत आहेत.

ईमेल पाठवून कर्मचाऱ्यांना दिली माहिती

आज 18 एप्रिल रोजी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये, कंपनीने लिहिले, तुमच्या अंतिम मूल्यांकनाच्या प्रयत्नाचे निकाल जाहीर करण्याव्यतिरिक्त, तुम्हाला सूचित केले जात आहे की अतिरिक्त तयारी वेळ, शंका दूर करण्याचे सत्र, एकाधिक मॉक असेसमेंट आणि तीन प्रयत्न करूनही तुम्ही ‘जेनेरिक फाउंडेशन ट्रेनिंग प्रोग्राम’साठी पात्रता निकष पूर्ण केले नाहीत.  त्यामुळं तुम्ही प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाचा प्रवास सुरु ठेवू शकणार नाही.

बाहेर संधी शोधण्याच्या प्रयत्नात इन्फोसिस मदत करणार

इन्फोसिसच्या बाहेर संधी शोधण्याच्या तुमच्या प्रवासात तुम्हाला मदत करण्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी व्यावसायिक आउटप्लेसमेंट सेवांची व्यवस्था करत आहोत. तुम्हाला बीपीएम उद्योगात संभाव्य भूमिकांसाठी तयार करण्यासाठी इन्फोसिस प्रायोजित बाह्य प्रशिक्षण घेऊन आम्ही तुम्हाला करिअरचा आणखी एक पर्याय देऊ इच्छितो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, तुम्ही इन्फोसिसमध्ये उपलब्ध संधींसाठी अर्ज करू शकता, जर तुम्हाला बीपीएम इंडस्ट्रीमध्ये त्याच वेळी बीपीएममध्ये संधी हवी असेल. कौशल्ये, नंतर इन्फोसिस प्रायोजित आयटी फंडामेंटल्स ट्रेनिंग प्रोग्राम देखील तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला जात आहे जेणेकरुन तुमच्या आयटी करिअरच्या प्रवासाला आणखी आधार मिळू शकेल. याशिवाय प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना म्हैसूर प्रशिक्षण केंद्र ते बंगळुरू किंवा त्यांच्या गावी एक महिन्याचा पगार, निवास, प्रवास भाडे मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

Google ने शेकडो कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता; अँड्रॉइड, पिक्सेल आणि क्रोम टीममधील मोठी कपात; नेमकं करण काय?

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.