नारहरी झिरवाल मुंबई : पनीर हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. विशेषतः लहान मुलांना हा पदार्थ खूपच आवडतो. त्यामुळे पनीरची मागणी वाढत आहे. मात्र काही हॉटेलमध्ये ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे दिसून येत आहे. बनावट पनीर किंवा पनीर ऐवजी चीज ऍनालॉगचा वापर होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. म्हणूनच एफडीएने आता आपला मोर्चा पनीर विक्रेत्यांकडे वळवला असून ग्राहकांची फसवणूक करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या कडून देण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पनीर ऐवजी चीज ऍनालॉगच्या होणार्या गैरवापराविरोधात कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. ग्राहकांना आपण ते जे अन्न खातात त्याबद्दल योग्य निर्णय व निवड करण्यासाठी अन्न पदार्थांतील घटक पदार्थांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. अन्न व सुरक्षा मानके (लेबलिंग आणि डिस्प्ले नियमन) 2020 मधील प्रकरण 3 मधील नियमन 9 (6) नुसार अन्न व्यावसायिकाने ग्राहकांना अन्न पदार्थांची विक्री करताना पोषण संबंधित माहिती तसेच त्यातील घटकांची माहिती व संदेश प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. तसे न करता ग्राहकांची फसवणूक केली जात असेल तर आता एफडीए कठोर कारवाई करणार आहे.
ग्राहकाच्या हिताचे रक्षण करण्याकरिता रेस्टॉरंट, हॉटेल, कॅटरर्स व फास्ट फूड आस्थापनांवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. यामध्ये पनीर ऐवजी चीन ऍनालॉगचा वापर होत असल्यास त्याबाबतच्या घटक पदार्थांची माहिती इलेक्ट्रॉनिक ऑर्डर मशीन, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड, मेनू कार्ड इत्यादींवर नमूद करणे आवश्यक आहे. या पृष्ठभूमीवर सर्व संबंधित अधिकार्यांना व्यावसायिकांचे खरेदी बिल्स तपासून कोणतीही फसवणूक किंवा दिशाभूल आढळल्यास सखोल तपासणी करुन अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 नियम व नियमन 2022 तसेच अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यावसायिक परवाना व नोंदणी) नियमन 2011 मधील तरतुदींनुसार तात्काळ परवाना निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोणत्याही प्रकारे ग्राहकांची फसवणूक होणार नाही व ते खात असलेल्या अन्नाबाबत त्यांना अवगत केले जाईल याची सुनिश्चिती एफडीए करणार आहे. तसे न झाल्यास गंभीर कारवाई केली जाणार आहे. या आदेशामुळे बनावट पनीर विकणार्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांना वठणीवर आणण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..